Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उद्योग, व्यवसायात भारतीय महिलांचीही झेप.. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत कोणी मिळवलेय स्थान

मुंबई : जेव्हा मुली सर्व शालेय शिक्षणात अव्वल होतात तेव्हा त्यांच्याकडे भविष्यातील डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी म्हणून पाहिले जाते. पुरुषप्रधान देशात मुलीला कौटुंबिक व्यवसाय सांभाळणे सोपे नसते. मग स्वतःचा व्यवसाय करणे त्याहून अवघड असते. मात्र या विचारसरणीचा काही महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने पराभव केला. आता भारतातील स्त्रिया केवळ कौटुंबिक व्यवसायच सांभाळत नाहीत तर स्वतःचे स्टार्टअपही मोठ्या समजूतदारपणे हाताळत आहेत.

Advertisement

देशातील अशा अनेक व्यावसायिक महिला आहेत ज्यांनी व्यवसायाच्या जगात आपले स्थान निर्माण केले आहे. देशातच नाही तर परदेशातही लोक त्यांना ओळखतात. तरुण उद्योजक महिलांसाठी हे कठीण लक्ष्य आहे. हे साध्य करणे सोपे नव्हते. परंतु, आपल्या कौशल्याने, समजुतीने त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करताना करोडो दुर्बल घटकातील महिलांना प्रेरणा दिली. फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट असलेल्या भारतातील पाच श्रीमंत व्यावसायिक महिलांबद्दल जाणून घेऊया.

Advertisement

सावित्री जिंदाल : फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव समाविष्ट आहे. सावित्री जिंदाल या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. जिंदाल ग्रुप स्टील, पॉवर, सिमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या व्यवसायात गुंतलेला आहे. या व्यवसाय समूहाची स्थापना सावित्री जिंदाल यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांनी केली होती. 2005 मध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्री जिंदाल आणि त्यांच्या मुलांनी व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी घेतली. सावित्री जिंदाल या ७१ वर्षांच्या असून त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही राहिल्या आहेत.

Advertisement

लीना तिवारी : यूएसव्ही इंडिया या फार्मा कंपनीच्या चेअरपर्सन लीना तिवारी या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर लीना तिवारी 100 लोकांच्या यादीत 43 व्या स्थानावर आहेत. लीना तिवारी यांची एकूण संपत्ती ४.४ अब्ज डॉलर आहे. लीना तिवारी यांची कंपनी USV India मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधांशी संबंधित आहे. लीना तिवारी यांच्या आजोबांनी ही कंपनी स्थापन केली होती.

Loading...
Advertisement

दिव्या गोकुळनाथ : 37 वर्षीय दिव्या गोकुलनाथचे नाव फोर्ब्स इंडियाच्या चौथ्या श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. दिव्या गोकुळनाथ या बायजूच्या सह-संस्थापक आहेत. हे एक ऑनलाइन शिक्षण मंच आहे. कोरोना महामारीच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असताना बायजूची वाढ झपाट्याने झाली. दिव्या यांचे वार्षिक उत्पन्न 4.05 बिलियन डॉलर झाले आहे.

Advertisement

किरण मुझुमदार शॉ : किरण मुझुमदार शॉ भारतातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्या 53 व्या क्रमांकावर आहेत. किरण मुझुमदार शॉ या बायोकॉन या भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध बायोफार्मास्युटिकल कंपनीच्या संस्थापक आहेत. या कंपनीची स्थापना 1978 मध्ये झाली. फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील ही एक मोठी कंपनी आहे. किरण मुझुमदार यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर आहे.

Advertisement

मल्लिका श्रीनिवासन : फोर्ब्सच्या यादीत मल्लिका श्रीनिवासन यांचे नाव ७३ व्या स्थानावर आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये 6 व्या क्रमांकावर आहेत. मल्लिका श्रीनिवासन या ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी 1960 मध्ये सुरू झाली. ही कंपनी जगातील तिसर्‍या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. मल्लिका श्रीनिवासन यांची एकूण संपत्ती 2.89 अब्ज डॉलर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply