Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. 5 कोटींची घड्याळे..! पण कोट्यवधींच्या घड्याळावर पांड्याने म्हटलेय ‘असे’; पहा नेमकी किती आहे किंमत

Please wait..

मुंबई : मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर बातम्या येण्यास सुरुवात झाली की सीमाशुल्क विभागाने क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची दोन घड्याळे जप्त केली आहेत. हार्दिकच्या या दोन घड्याळांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. वृत्तानुसार हार्दिककडे या घड्याळांचे इनव्हॉइस नव्हते किंवा त्याने सीमाशुल्क विभागाला माहिती दिली नव्हती. मात्र, टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने लवकरच या प्रकरणावर ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. हार्दिकने या गोष्टींना अफवा म्हटले आहे.

Advertisement
Loading...

हार्दिकने सांगितले की, त्याच्याकडे घड्याळे आणि इतर वस्तू आहेत ज्याची माहिती त्याने स्वतः विभागाला दिली होती. त्याचवेळी आपल्यावर जी काही ड्युटी असेल ती मी भरणार असल्याचे विभागाला सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटलेले आहे. एवढेच नाही तर मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने घड्याळांची किंमत पाच नाही तर दीड कोटी रुपये असल्याचेही सांगितले आहे. हार्दिक म्हणाला आहे की, ’15 नोव्हेंबर रोजी सकाळी दुबईहून आल्यावर माझे सामान उचलल्यानंतर मी आणलेल्या सामानाची माहिती देण्यासाठी मी मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे गेलो. मालासाठी लागणारे कस्टम्स ड्युटी भरण्यासाठी तिथे गेलो होतो. मी मुंबई विमानतळावर सामानाची घोषणा केली नसल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि मला यासंबंधीचा सर्व वाद मिटवायचा आहे.

Advertisement

Advertisement

या दोन्ही घड्याळांची किंमत सुमारे 5 कोटी भारतीय रुपये असल्याचे बोलले जात होते. परंतु आता पंड्याने तसे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘सोशल मीडियावर अफवा पसरवल्याप्रमाणे घड्याळाची किंमत 5 कोटी नाही तर 1.5 कोटी रुपये आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबई कस्टम विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळाले असून मी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि त्याच वेळी मी त्यांना सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रे मिळवून देईन. माझ्यावरील कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन करण्याचे सर्व आरोप निराधार आहेत’, असे पांड्याने म्हटलेले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply