Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

… अन् तरीही ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेलची रेकॉर्ड ब्रेक विक्री; पहा, ‘असे’ कशामुळे घडले..?

नवी दिल्ली : देशात सध्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू आहे. इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. असे असले तरी आजही अनेक राज्यात पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. इंधनाच्या किंमती वाढल्या असल्या तरी मागणी आणि विक्रीवर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पेट्रोलियम योजना आणि विश्लेषण विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात इंधनाची मागणी थोडी कमी झाली होती. मात्र, याचे कारण दरवाढ नव्हे तर पाऊस होते. या काळात देशभरात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. ऑगस्ट महिन्यात 2693 मेट्रीक टन पेट्रोल विक्री झाली होती. या महिन्यात पेट्रोलच्या किंमती 40 पैशांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पेट्रोलच्या मागणीत घट नोंदवण्यात आली. या महिन्यात 2599 मेट्रीक टन इतकी मागणी होती. या महिन्यात पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढले होते.

Advertisement

ऑक्टोबर महिन्यात मात्र इंधनाच्या दरात वाढ झाली. मागील तीन वर्षांतील एक महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात इंधनास जास्त मागणी राहिली. विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलचे दरात 7.45 रुपये वाढ झाली होती. यावेळी पेट्रोलचे भाव 109.34 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले होते. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली नाही. या काळात कोरोनाचे निर्बंध बऱ्यापैकी कमी झाले होते. त्यामुळे देशभरात पेट्रोलियम पदार्थांना मागणी वाढल्याचे दिसून आले. मागणी वाढत असल्याने दरवाढही सुरू होती. मात्र, त्याचा फारसा फरक पडला नाही.

Loading...
Advertisement

भारीच आहे की..! तर फक्त 60 रुपयांत मिळेल पेट्रोल; पहा, मोदी सरकारचा काय आहे खास प्लान..?

Advertisement

मोदी सरकारनंतर या राज्यांनीही कमी केले पेट्रोल-डिझेलचे दर, महाराष्ट्र सरकार घेणार का निर्णय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply