बाब्बो.. त्या 49 कंपन्यांनी वर्षभरात मिळवलेत तब्बल 1 लाख कोटी रुपये; पहा, काय केलीय कामगिरी
मुंबई : शेअर बाजारात सध्या आयपीओना अच्छे दिन आले आहेत. कोरोनाच्या संकटात जवळपास प्रत्येक क्षेत्रास मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, या संकटाच्या काळातही शेअर बाजाराची घोडदौड सुरुच होती. या काळात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. कंपन्यांनी पाहता पाहता अब्जावधींचे भांडवल गोळा केले. गुंतवणूकदारांना सुद्धा जबरदस्त फायदा मिळाला. त्यामुळे शेअर बाजारातील सध्याचे वातावरण पाहता अनेक कंपन्यांनी आयपीओ आणण्याचे नियोजन केले आहे.
स्टॉक मार्केट डेटाच्या विश्लेषणानुसार, या वर्षात 2021 मध्ये आतापर्यंत 49 कंपन्यांनी IPO च्या माध्यमातून 1.01 लाख कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टनेही शेअर्सच्या विक्रीतून 3,800 कोटी रुपये उभे केले आहेत. संपूर्ण वर्ष 2020 च्या तुलनेत यावर्षी IPO मार्केटची कामगिरी चांगली राहिली आहे. गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांनी IPO मधून केवळ 26,611 कोटी रुपये उभे केले होते.
सेबीच्या मंजुरीनंतर पेटीएमच्या शेअर्सचे वाटप 16 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. कंपनी 2150 रुपये प्रति शेअर या दराने शेअरचे वाटप करेल. पेटीएमला सोमवारी यासाठी नियामक मान्यता मिळू शकते. यापूर्वी असे म्हटले जात होते की डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम सोमवारी शेअर्सचे वाटप करेल. सेबीच्या मंजुरीनंतर पेटीएम मंगळवारी शेअर्सचे वाटप करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
पेटीएम 18 नोव्हेंबरला लिस्टिंगसाठी तयार आहे. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असेल. यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या कोल इंडिया कंपनीचा आयपीओ शेवटच्या दिवशी 15.28 पट सबस्क्रिप्शनसह बंद झाला होता. ‘Nykaa’ आणि ‘Policybazaar’ च्या अलीकडील आयपीओ मध्ये देखील असाच ट्रेंड दिसून आला आहे.
अरे वा.. ‘पेटीएम’ चा आयपीओ लवकरच येणार..! पहा, कधी येणार आयपीओ, काय आहे कंपनीचे नियोजन..?
आता ‘या’ सहा कंपन्यांचे आयपीओ लवकरच येणार; पहा, कोणत्या आयपीओना ‘सेबी’ ने दिलीय मंजुरी