Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महत्वाचे : पहा कोणती कार आहे सर्वाधिक सेफ; क्रॅश टेस्टमध्ये काय आढळले ते पहा

पुणे : ग्लोबल NCAP ही एक स्वतंत्र संस्था आहे जी वेगवेगळ्या कारच्या क्रॅश चाचण्या करते. ही संस्था वेगवेगळ्या देशांमध्ये कारच्या सुरक्षा चाचण्या घेते आणि वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत ज्यांनी क्रॅश टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याबद्दल माहिती वाचा. कार खरेदी करताना आपणास याचा खूप फायदा होईल.

Advertisement

Mahindra XUV 700 : महिंद्रा XUV 700 या कारने अलीकडेच ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 66 पैकी 57.69 गुण मिळवले आहेत. काही काळापूर्वी लाँच झालेल्या या कारला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला असून लोकांनी ती प्रचंड खरेदी केली आहे. ही पहिल्या स्थानावर आहे.

Advertisement

Tata Punch : टाटा पंच ही या यादीतील दुसरी सर्वात सुरक्षित कार आहे. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत त्याला 66 पैकी 57.34 गुण मिळाले. कारची सुरुवातीची किंमत 5.49 लाख रुपये आहे. कंपनीने नुकतीच ही मायक्रो एसयूव्ही लाँच केली.

Advertisement

Mahindra XUV 300 : महिंद्रा XUV300 या कारला 66 पैकी 53.86 गुण मिळाले. त्याला अडल्ट ऑक्युपेंसी त 5 स्टार आणि चाइल्ड ऑक्युपेंसीत 4 स्टार मिळाले. त्याची सुरुवातीची किंमत 7.95 लाख रुपये आहे. ही कार 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिनसह येते.

Loading...
Advertisement

Mahindra Thar : महिंद्रा थार ही महिंद्राची पॉवरफुल ऑफरोडर कार सुरक्षेच्या दृष्टीनेही जबरदस्त आहे. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 66 पैकी 53.63 गुण मिळाले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 12.78 लाख रुपये आहे.

Advertisement

Tata Tigore EV : टाटा टिगोर इ.व्ही. ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. या यादीत ही कार 4 स्टार सुरक्षा रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहे. त्याची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे. ही कार अनेक सेफ्टी फीचर्ससह येते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply