Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिवाळीत चीनला बसणार असा फटका; पहा, भारतीयांचा नेमका काय आहे प्लान..?

नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत चीनला पुन्हा झटका देण्याची तयारी देशवासियांनी केली आहे. दिवाळीत चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे नियोजन आहे. व्यापार संघटना CAIT ने केलेल्या बहिष्काराच्या आवाहनामुळे चिनी निर्यातदारांना दिवाळीच्या काळात 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. संघटनेचे सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी याबाबत माहिती दिली.

Advertisement

मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा संघटनेने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशातील व्यापारी आणि आयातदारांनी चीनमधून आयात बंद केली आहे, असा दावा संघटनेने केला आहे. यामुळे दिवाळीच्या काळात चीन बरोबरील व्यापारात 50 हजार कोटींचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने देखील म्हटले आहे की, गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सीएआयटीने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून, चीनला सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक नुकसान होणार असल्याचे निश्चित आहे. सीएआयटीचे म्हणणे आहे की, भारतीय व्यापाऱ्यांकडून चिनी वस्तूंची आयात थांबवून हे शक्य होणार आहे.

Advertisement

संस्थेच्या संशोधन शाखेने नुकतेच 20 आर्थिक शहरांमध्ये सर्वेक्षण केले होते. यामध्ये असे दिसून आले की, आतापर्यंत दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी भारतीय व्यापारी किंवा आयातदारांनी चिनी निर्यातदारांना ऑर्डर दिलेली नाही. नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर, लखनऊ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मदुराई, पाँडेचेरी, भोपाळ आणि जम्मू ही 20 शहरे सर्वेक्षणात समाविष्ट आहेत.

Loading...
Advertisement

भारत आणि चीन दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे.  चीनच्या कारवायांमुळे भारतीय नागरिकांत संताप आहे. दोन्ही देशांतील व्यापार मात्र सुरू आहे. या वादाचा व्यापारावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, काही प्रमाणात तरी चीनला फटका बसला आहे. आताही दिवाळीच्या काळात चिनी वस्तू खरेदी करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे चीनला यावेळीही काही प्रमाणात फटका बसणार आहे.

Advertisement

‘तशा’ पद्धतीने कॅट देणार आहे चीनला झटका; पहा भारतीयांचा नेमका काय आहे प्लान

Advertisement

कोरोना काळात भारतीयांनी या गोष्टीत टाकले चीनला मागे.. जाणून घ्या कोणती गोष्ट आहे ती..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply