Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून या वर्षात सोन्याला मागणी राहणार कमी; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : जागतिक बाजारात सध्या सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. कोरोना महामारीच्या काळात सोन्यास मागणी घटली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. आगामी काळातही या किंमती फारशा वाढण्याची शक्यता नाही, असे सांगणारा अहवाल आहे. वर्ल्ड गोल्ड कौंन्सिलने हा अहवाल तयार केला असून या अहवालात सोन्याच्या मागणीबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगामी काळात सोन्यास मागणी वाढली नाही तर दरातही फारशी वाढ होणार नाही, अशी शक्यता आहे.

Advertisement

या अहवालात म्हटले आहे, की कोरोनामुळे चालू आर्थिक वर्षात सोन्यास जास्त मागणी राहणार नाही. कोरोनामुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रोजचा खर्च आणि बचत यांचा ताळमेळ बसत नाही, अशी परिस्थिती आहे. काही पैसे बाजूला राहतील असे नियोजन करणे सध्याच्या काळात अशक्य होत आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत घट होणार आहे. पुढील वर्षात 2022 मध्ये मात्र सोन्यास मागणी वाढणार आहे. ‘The Divers Of Indian Gold Demand’ नावाच्या या रिपोर्टमध्ये कौन्सिलने म्हटले आहे, की कोरोनाचा प्रसार रोखण्यात बराच काळ गेल्याने या वर्षात देशभरात सोन्यास फार मागणी राहणार नाही, अशी शक्यता आहे.

Advertisement

असे असले तरी सोन्याच्या आयातीत मात्र फरक पडणार नाही. तसेच ज्या प्रमाणात देशातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध कमी होतील त्या प्रमाणात सोन्याच्या मागणीतही वाढ होईल. 2022 मध्ये जर कोरोना पुन्हा फैलावला नाही तर अर्थव्यवस्थेचा वेग आणि सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Loading...
Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती

Advertisement

सोने-चांदी बाजारभाव : आज सोने आणि चांदीचे भाव वाढले, जाणून घ्या काय आहे नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply