Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. चीनी कंपन्यांच्या साम्राज्याला बसलाय धक्का; पहा, कोणती कंपनी ठरलीय जगात नंबर वन ?

नवी दिल्ली : जगभरात चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा दबदबा आहे. अनेक देशांतील मार्केट या मोबाइल कंपन्यांनी काबीज केले आहे. त्यामुळे मोबाइल म्हटला की चीनचाच.. असे समीकरण तयार होत आहे. जगातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या मोबाइलच्या तुलनेत चीनी कंपन्यांच्या फोनला जास्त मागणी असते. त्यामुळेच तर शाओमी, ओप्पो, व्हीवो, रियलमी यांसारख्या चायनीज कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. असे असले तरी यंदा मात्र या सर्व कंपन्यांना सॅमसंग कंपनीने जोरदार झटका दिला आहे. या कंपनीने पहिल्यांदाच स्मार्टफोनच्या जागतिक बाजारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अॅपल कंपनीस दुसरा क्रमांक मिळाला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, मोबाइल बाजारात नेहमीच दमदार कामगिरी करणाऱ्या चीनी कंपन्या या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मागे पडल्या आहेत. ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म ‘Canalys’ ने ही माहिती दिली आहे. 23 टक्के मार्केट हिश्श्यासह सॅमसंग कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 15 टक्क्यांसह अॅपल दुसऱ्या तर 14 टक्के मार्केट शेअरसह चीनची शाओमी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. व्हीवो आणि ओप्पो या दोन्ही कंपन्या प्रत्येकी 10 टक्के मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

Advertisement

सॅमसंग कंपनीने यावेळी पहिला क्रमांक मिळवला असला तरी मागील वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा मार्केट शेअर वाढलेला नाही. मागील 2020 मध्ये या काळात कंपनीचा मार्केट शेअर 23 टक्के होता. आणि यंदाही तितकाच आहे. मागील वर्षात जगभरात कोरोनाचा प्रकोप जास्त होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. तरी देखील कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये वाढ झालेली नाही.

Loading...
Advertisement

भारतात चायनीज कंपन्यांची जबरदस्त क्रेझ आहे. तसेच सॅमसंगच्या फोनलाही चांगली मागणी आहे. त्यामुळेच तर या कंपन्यांचे मोबाइल हातोहात विकले जातात. सध्या भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र त्याचा व्यापारावर परिणाम झालेला नाही. चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारताच्या बाजारपेठेतील 79 टक्के हिस्सा काबीज केला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 10 चिनी स्मार्टफोनपैकी 8 स्मार्टफोन विकले गेले आहेत. सध्या भारतात शाओमी कंपनी आघाडीवर आहे. देशातील आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये सॅमसंग वगळता बाकी 4 कंपन्या चीनच्या आहेत.

Advertisement

अर्र.. हे काय..! युरोपातील ‘हा’ देश म्हणतोय चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन फेकून द्या; पहा, नेमके घडलेय तरी काय ?

Advertisement

बाब्बो….! Google ही आता स्मार्टफोनच्या स्पर्धेत…आणणार अनोखे फिचर…वाचा…

Advertisement
Advertisement

Leave a Reply