Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऑक्टोबर देतोय टेन्शन…! महिन्यात तब्बल ‘इतक्या’ वेळेस इंधन दरवाढ; आजही दिलासा नाहीच

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात जसा उन्हाच्या कडाक्याने लोक हैराण होतात, तसाच यंदा ऑक्टोबर महिन्यात वाढत्या महागाईने नागरिकांना हैराण केले आहे. या महिन्यात महागाई वेगाने वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल तर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच वाढत आहेत. तेल कंपन्या काही केल्या दिलासा देण्यास तयार नाहीत. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. या महागाईने सर्वसामान्यांचे टेन्शन मात्र वाढत आहे.

Advertisement

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रति लिटर दर 115.38 रुपये इतका आहे.

Advertisement

राजधानी दिल्ली शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.47 आणि 94.27 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपयांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 81 डॉलर्स इतका आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढ करणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Loading...
Advertisement

ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटरमागे 4.35 रुपयांनी वाढले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रति बॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.

Advertisement

बाब्बो.. ‘या’ देशात फक्त 3 रुपयात मिळतयं पेट्रोल; कारण ऐकून होताल थक्क..!

Advertisement

बाब्बो… पेट्रोल आणायला लोकं चाललेत की नेपाळला; पहा, कुठे घडतोय ‘हा’ चमत्कारिक प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply