शेतकरी आंदोलन ब्लॉग : आता अती झालं.. पाप्याचा घडा भरतोय.. मग महाभारत घडणारच..!

शेतकरी आंदोलनाबाबत सध्याची वेळ ही भूमिका घेण्याची आहे. कोणत्याही पक्षाच्या चष्म्यातून हे नीट दिसणार नाही. त्यासाठी आधी स्वतःला भारतीय असल्याचा चष्मा घालावा लागेल. तरच स्वच्छ आणि खरं काय ते दिसेल..! आणि आता बांधावरची भूमिका घेऊन चालणार नाही. ती वेळ निघून गेली आहे.
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध |
Advertisementजो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध ||
Advertisementहे संधीसाधू पुढाऱ्यांनी जास्त लक्षात ठेवले पाहिजे.
Advertisement
सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते कुठल्या तरी वर्गाचे असते. त्यांच्या भल्यासाठी ते काम करत असते. त्यांना सोईचे होतील असेच नियम, कायदे बनवले जातात. सरकार कोणत्या वर्गाचे आहे हे कसे ओळखायचे? सरकारवर कोणता वर्ग नाराज आहे आणि मंत्र्यांच्या खुर्ची शेजारी कोण बसतो यावरून ते दिसते.
- लेखक : अप्पा अनारसे (युक्रांद सहकार्यवाहक)
- मु.पो. अळसुंदे, ता. कर्जत, जि. अहमदनगर
- मो. 9096554419
सध्याच्या केंद्रातल्या भाजप सरकार विरोधात देशभर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला दहा महिने होऊन गेले. तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरीही मागे हटण्याचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना माहित आहे. ही शेवटची लढाई आहे. आता घरी गेलो तर शेती भांडवलदार, कंपन्यांच्या घशात जाणार आहे. त्यामुळे शेतकरी प्राणपणाने आपल्या काळ्या आईसाठी निकराने लढत आहेत.
शेतकरी आंदोलनाला सतत बदनाम केले गेेले
सत्तेत आल्यापासून भाजप सरकारचे एक वैशिष्ट्य राहिली आहे. आपल्या विरुध्द कोणी बोलले, आंदोलन केले तर त्याला बदनाम करायचे. विरोध करणारा कधी देशद्रोही असतो, कधी नक्षलवादी, तर कधी अर्बन नक्षल असतो! याच प्रकारे शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी कथित झेंड्याचा अपमान केल्याचे कुंभाड रचले गेले. त्याचेही सत्य लोकांसमोर आले. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न झाला. तोही फसला..! टूल किट प्रकरणही असेच हवेत तापवले गेले. अशा अनेक वेगवेगळ्या खोड्या करून शेतकरी आंदोलनाला बदनाम करायचे प्रयत्न झाले. पण देशातील लोकांचा विश्वास मात्र सरकारपेक्षा जास्त शेतकऱ्यांवरच दिसला. मी स्वतः दिल्लीतील आंदोलनात काही दिवस राहून आलो आहे. तिथे स्टेजवरून हिंसक बोलायलाही परवानगी नाही. कुणावर वैयक्तिक टीकाही करायची नाही. असे काही नियम शेतकरी नेत्यांनी स्वतःवर घालून घेतले आहेत.
- अनेक वेळा धमक्या, हल्ले
- दिल्लीतील शेतकऱ्यांना मदत करतो म्हणून अनेक लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या घरावर सरकारने धाडी घातल्या, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलन अशा सर्व प्रकरच्या अग्निदिव्यातून पुढे जात राहिले. लोकांचा मदतीचा हात अजूनपर्यंत थांबला नाही. जानेवारी महिन्यात आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला गेला.
प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी देशभरातून दहा लाखांची भव्य ट्रक्टर रॅली आयोजित केली. भाजपने त्या वेळीही आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. भाजपचे हस्तक असलेल्या शेतकरी गटाला हाताशी धरून रॅलीचा मार्ग बदलून काही ट्रॅक्टर मुद्दाम लाल किल्ल्याच्या दिशेने नेण्यात आले. इतर दिवशी आम्हाला साधं लाल किल्ला पाहण्यासाठी शेकडो पोलिसांचे बँरिकेट आणि प्रचंड सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागत होते. असे असताना नेमक्या ट्रॅक्टर मार्च दिवशीच ही व्यवस्था कुणी सैल केली?
अत्यंत कडक बंदोबस्त असलेल्या लाल किल्ल्याचे दरवाजे या फितूर गटासाठी उघडण्यात आले व शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर हल्ला केल्याच्या बनावट बातम्या प्रसारित करून आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात लाठीमार करून अनेकांची डोकी फोडली, हाडे गोठवणाऱ्या थंडीत पाण्याचे फवारे मारले गेले पण शेतकरी मागे हटला नाही.
- जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी लखिमपुरची घटना
- नवीन तीन कृषी कायदे रद्द करा, हमीभाव देणारा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा जास्त काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याला पाठींबा देण्यासाठी देशभरातले शेतकरी आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाठींबा देत आहेत. याचाच एक भाग म्हणून उत्तरप्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केले होते.
“आम्हाला संधी मिळू द्या मग शेतकऱ्यांना कसे दोन मिनिटात सरळ करतो पहा.” असेच ते म्हटले. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी निदर्शने करण्याची हाक दिली होती. ही निदर्शने करून शेतकरी शांतपणे आपल्या घराकडे परत जात होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने व त्याच्या गुंडांनी घरी परतत असलेल्या या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले. इंग्रजांनीही कधी एवढ्या क्रूरपणे शेतकऱ्यांना गाड्यांखाली चिरडले नव्हते. जनरल डायरलाही लाजवेल असे हे कृत्य आहे. पाच दिवस होऊन गेले. व्हिडीओत शेतकऱ्यांना स्पष्टपणे चिरडताना दिसत असूनही मंत्रीपुत्राला अजूनपर्यंत अटक केली गेली नाही.
हम डरे नही डायरसे
Advertisementतो क्या डरेंगे ‘कायरसे’
Advertisementयातून शेतकरी अशा भ्याड हल्याला भिक घालणार नाहीत हे स्पष्ट दिसते आहे.
Advertisementलोकशाहीत यांची जागा लोक त्यांना निवडणुकीत नक्कीच दाखवतील.
Advertisement
- जगातील सर्वात दीर्घ काळ सुरू असलेला सत्याग्रह
- या शेतकरी आंदोलनाने अनेक चढ उतार पाहिले. हे फक्त भारतातीलच नव्हे तर मला वाटते जगातील सर्वात मोठा आणि जास्त दिवस सत्याग्रह असावा. आंदोलन एवढ्या दिवस चालू शकले ते अहिंसा असल्यामुळेच. अहिंसा हीच या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळेच हे आंदोलन शेवटी यशस्वी होणार अशी खात्री वाटते. ज्या प्रकारे सरकार आरोपी मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेच मंत्री ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना धमक्या देत आहेत. यातून शेतकऱ्याबद्दल सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट दिसत आहे. चार दोन कंपन्यांसाठी, मूठभर भांवलदरांसाठी सरकार अशा प्रकारचे कायदे आणू पाहत आहे. पण शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं हा खेळ सहन करणार नाहीत. या आंदोलनात दिलेली घोषणा शेतकऱ्यांचा निर्धार दाखवून देते.
खून से लिखा इतिहास
Advertisementस्याही से नही बदलने देंगे
Advertisementबेच दिया तुने रेल्वे और जहाज
Advertisementपर खेत नही बिकने देंगे|
Advertisement
शेवटी पाप्याच्याही पापाचा घडा भरतोच. लोक तोपर्यंतच शांत असतात, अन्याय पहात असतात, सहन करतात.. जो पर्यंत कौरव द्रोपदीच्या साडीला हात लावत नाहीत, त्यानंतर मात्र महाभारत अटळ आहे..!