Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव… आता इंटरनेट नसले तरीही पैसे होतील ट्रान्सफर..! पहा, काय आहे ऑफलाइन पेमेंट योजना; आरबीआयने दिलीय माहिती

नवी दिल्ली : आजच्या डिजीटल जमान्यात ऑनलाइन कामकाज मोठ्या प्रमाणात होत आहे. बँकिंग विश्वातही ऑनलइन प्रणालीला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पैसे खात्यात जमा करण्यासह अन्य महत्वाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत आहे. ऑनलाइन कामकाज म्हटल्यानंतर इंटरनेट पाहिजेच. इंटरनेट नसेल तर कुणाला ऑनलाइन पैसे पाठवायचे असतील तर ते शक्य होणार नाही. पण, आता काळजी करू नका, आता हे टेन्शन सुद्धा लवकरच मिटणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने आता असे भन्नाट नियोजन केले आहे, की इंटरनेट नसले तरी सुद्धा ऑफलाइन पद्धतीने पैसे देवाणघेवाण व्यवहार करणे शक्य होणार आहे.

Advertisement

बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना या सुविधेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रिजर्व बँकेने देशभरात ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी एक प्रणाली आणली आहे. ऑफलाइन पद्धतीने पेमेंट करण्याच्या या व्यवस्थेचे तीन पायलटही प्रोजेक्ट आतापर्यंत देशात राबवण्यात आले आहेत, त्यानंतर आता ही योजना संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे.

Advertisement

ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही तेथे या पद्धतीचा फायदा होईल. इंटरनेट नाही म्हणून काम थांबणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात सुरू होणार आहे. बँकेने या योजनेची घोषणा 6 ऑगस्ट 2020 रोजी केली होती. याबाबत अजूनही चाचणी सुरू आहे. सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत तीन पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आले. यामध्ये यश आल्यानंतर आता संपूर्ण देशात ही योजना लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये कमीत कमी 200 रुपये तर जास्तीत जास्त 2000 रुपये ट्रान्सफर करता येत होते. लवकरच आता सर्वांना ऑफलाइन पेमेंट करता येणार आहे.

Loading...
Advertisement

पैशांच्या ऑनलाइन व्यवहारांच्या ‘या’ नियमात बदल; पहा, काय आहे नवीन नियम; नागरिकांना होणार फायदा

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply