Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. डाळिंब खातोय ‘दणक्यात’ भाव; पहा कुठे मिळतोय 278 रुपये किलोचा रेट..!

पुणे : कोरडवाहू भागाचे वरदान म्हणून ओळख पावलेल्या डाळिंब फळाची बाजारपेठ सध्या काही ठिकाणी जोमात, तर काही ठिकाणी कोमात असेच चित्र आहे. व्यापारी आणि मार्केट कमिटी यांच्यामध्ये उत्पादक शेतकरी अडकला आहे. त्यामुळेच एकीकडे डाळिंब फळाचा सरासरी भाव 50 ते 60 रुपये असतानाच काही ठिकाणी मात्र दणक्यात भाव मिळत आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीत डाळिंब फळाला तब्बल 278 रुपये किलोचा जास्तीतजास्त भाव मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी येथील बाजार समितीत कमीतकमी भाव 10 रुपये असून सरासरी फ़क़्त 50 रुपये किलो आहे. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीतही असाच प्रकार आहे. कारण इथे कमीतकमी भाव चक्क अडीच रुपये किलो आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर लोकल 47 500 9000 5500
अहमदनगर भगवा 2470 1750 19455 5903
औरंगाबाद 43 300 7800 4050
जळगाव गणेश 7 3000 9000 7500
मंबई 708 6600 12000 9300
नागपूर लोकल 69 2000 6000 5250
नाशिक 250 250 12100 6100
नाशिक भगवा 497 350 12740 6755
नाशिक मृदुला 2326 400 12500 9500
नाशिक आरक्ता 220 200 5250 3750
पुणे लोकल 6 5000 6000 5500
पुणे भगवा 551 3050 13750 6250
सांगली लोकल 186 2000 15000 8500
सोलापूर लोकल 1854 1000 13000 3300
सोलापूर भगवा 1793 800 11250 5500

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
मुंबई – फ्रुट मार्केट 708 6600 12000 9300
पिंपळगाव बसवंत 250 250 12100 6100
सटाणा आरक्ता 220 200 5250 3750
पंढरपूर भगवा 824 1000 14000 7000
सटाणा भगवा 497 350 12740 6755
राहता भगवा 2290 1000 27800 5000
जळगाव गणेश 7 3000 9000 7500
सांगली -फळे भाजीपाला लोकल 186 2000 15000 8500
पुणे-मोशी लोकल 6 5000 6000 5500
नागपूर लोकल 69 2000 6000 5250

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply