बाब्बो.. आता ‘या’ शहरात डिझेलने केलेय शतक; पेट्रोलही मिळतेय 111 रुपये लिटर; पहा, आज काय आहेत भाव
नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अर्थव्यवस्था या संकटातून हळूहळू सावरत आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलियम पदार्थांना मागणी प्रचंड वाढली आहे. त्यातुलनेत तेलाचा पुरवठा मात्र कमी पडत आहे. परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मागील तीन वर्षांच्या काळात पहिल्यांदाच असे घडले आहे, की कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. या भाववाढीचा सर्वाधिक फटका विकसनशील आणि गरीब देशांना बसत आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत डिझेलचे दर शंभर रुपयांच्या आत होते. आता मात्र, डिझेलने सुद्धा शंभरचा टप्पा पार केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा 108.67 रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.80 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्ली शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.64 आणि 91.07 रुपये इतका आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 पैसे आणि 32 पैशांची वाढ केली.
या इंधन दरवाढीमुळे भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीने नवे रेकॉर्ड केले आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 111 रुपये इतकी आहे. तर डिझेलनेही शंभरी पार केली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 109.40 आणि 100.10 रुपये इतकी नोंदवण्यात आली. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (आरपीडीए) च्या आकडेवारीनुसार, जयपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने शंभरचा टप्पा पार केला आहे.
या भाववाढीचा परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण, भारत जवळपास 80 टक्के तेल आयात करतो. तेलासाठी डॉलरच्या र रुपात पैसे द्यावे लागतात. त्यामुळे आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. परिणामी मागील तीन ते चार दिवसांपासून देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर वाढ करण्यास सुरुवात केली आहे. डिझेलचे दर वेगाने वाढत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून पुढील दिवसात किमती आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सध्या इंधनाचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.