Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. त्या प्रकरणातही आलेय सचिन तेंडुलकरांचे नाव..! पहा नेमके काय म्हटलेय बातमीत

Please wait..

मुंबई : पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर लीकमुळे जगभरात दहशत निर्माण झाली होती. बनावट कंपन्यांचे सत्य आणि मोठ्या व्यक्तींची करचुकवेगिरी समोर आली होती. भारतात यावर पुढे काहीही झाले नाही. पाकिस्तानात याच मुद्द्यावर सत्तांतर झाले. मात्र, भारत सरकारच्या आर्थिक गुन्हे तपास करणाऱ्या यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आता पुन्हा एकदा ICIJ (इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स) यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. संपूर्ण गेम उघडकीस आल्यानंतर भारतीय सेलिब्रिटी यात अडकल्याचे समोर येत आहे.

Advertisement
Loading...

जगभरातून 1.19 कोटी कागदपत्रे शोधल्यानंतर ही ‘आर्थिक रहस्ये’ जगासमोर आणली गेली आहेत. आयसीआयजेने सांगितले होते की 117 देशांतील 600 पत्रकार पेंडोरा पेपरच्या तपासात सहभागी होते. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, यूके कोर्टात स्वतःला दिवाळखोर असल्याचा दावा करणाऱ्या अनिल अंबानी यांच्याही परदेशात 18 कंपन्या आहेत. त्याचवेळी पंजाब नॅशनल बँकेतून हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बहिणीने पळून जाण्याच्या एक महिन्यापूर्वी ट्रस्टची स्थापना केली होती. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर भारतीयांनी त्यांच्या संपत्तीचे ‘पुनर्गठन’ करण्यास सुरुवात केल्याचेही अहवालात म्हटले आहे. यानुसार क्रिकेट लीजेंड सचिन तेंडुलकरनेही लीक झाल्यानंतर तीन महिन्यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील आपली मालमत्ता विकण्यास सुरुवात केली होती.

Advertisement

300 पेक्षा जास्त भारतीय नावांपैकी 60 पैकी पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत. हे सर्व तपासण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येत्या काही दिवसांत ही नावे उघड होतील. या लोकांनी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामापर्यंत करांचे आश्रयस्थान उभे केले आहेत. आर्थिक गुन्हे आणि कर टाळण्यासाठी तपासांना सामोरे जाण्याचे टाळण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply