Take a fresh look at your lifestyle.

किती ही महागाई..! पेट्रोल-डिझेलनंतर आता ‘या’ इंधनाचे दर वाढले; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 25 पैशांनी वाढले आहे. मागील आठ दिवसात डिझेल 1.15 रुपये तर पेट्रोल 70 पैशांनी वाढले आहे. त्यानंतर आता या दरवाढीत आणखी एका इंधनाची भर पडली आहे. आज सीएनजी आणि पीएनजी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या काळात आणखी एक झटका बसला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्याची सुरुवात इंधन दरवाढीने झाली आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे. दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबई शहरातही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

याआधी जुलै महिन्यात मुंबईत सीएनजी मध्ये 2.58 रुपये तर पीएनजीच्या दरात 55 पैसे वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने दरवाढ झाली नाही. पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीच्या दरात लवकरच वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज या इंधनाचे दर वाढले आहेत. देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply