Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्रर… पहिल्याच घासाला मीठाचा खडा…गुंतवणूकदारांची वाढली डोकेदुखी…वाचा नेमकं कारण..

ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी आणि भांडवली आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भांडवली बाजारातील स्थितीकडे लोकांचे लक्ष असते. कारण या दिवसांत घडलेल्या घटनांवरून पुढील आठवड्याचे अंदाज बांधले जातात. मात्र गुंतवणूकदारांचे ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवसाने नुकसान केले आहे.

मुंबई : गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजाराची मोठी क्रेज आहे. सध्या अनेकजणांच्या गप्पांचा विषयही शेअर बाजाराशी संबंधीत असतो. तर गेल्या काही दिवसात भांडवली बाजार कायम तेजीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र आज या आनंदाला चांगलाच ब्रेक लागला आहे.

Advertisement

ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी आणि भांडवली आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भांडवली बाजारातील स्थितीकडे लोकांचे लक्ष असते. कारण या दिवसांत घडलेल्या घटनांवरून पुढील आठवड्याचे अंदाज बांधले जातात. मात्र गुंतवणूकदारांचे ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवसाने नुकसान केले आहे. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे  आज फक्त पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एम अँड एम आणि बजाज ऑटो चे शेअर्स सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान हिरव्या चिन्हावर उघडले. तर रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक, डॉ रेड्डी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, टीसीएस, आयटीसी, इन्फोसिस, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, एसबीआय, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी , टायटन, सन फार्मा, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व आणि मारुतीचे समभाग धोक्याच्या असलेल्या लाल चिन्हावर उघडले.

Loading...
Advertisement

काल शेवटच्या सत्रात शेअर बाजार दिवसभराच्या अस्थिरतेच्या लाल चिन्हावर बंद झाला. त्यात सेन्सेक्स 286.91 अंक (0.48 टक्के) खाली 59,126.36 वर बंद झाला तर निफ्टी 93.15 अंक (0.53 टक्के) खाली 17,618.15 वर बंद झाला. त्यापाठोपाठ आज सकाळी शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 394.26 अंक किंवा 0.67 टक्क्यांनी खाली 58732.10 वर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110 अंकांनी (0.62 टक्के) 17508.20 पातळीवर उघडला. सुरूवातीलाच बाजारात 807 समभाग वाढले आणि 981 समभाग घसरले तर 117 समभाग अपरिवर्तित राहिले.

Advertisement

गेल्या काही दिवसात सेन्सेक्सने 60 हजारांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र आता ऑक्टोबरच्या पहिल्याच सत्रात झालेल्या गडगडाटीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  मात्र या गडगडाटीमध्येही गेल्या आठवड्यातील सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांचे बाजार भांडवल एकूण 1,56,317.17 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसले. तसेच  रिलायन्स पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीत आपले पहिले स्थान कायम ठेवले.  तर रिलायन्सपाठोपाठ अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँक यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply