आधी काँग्रेस, आता राज्ये जबाबदार; पहा, ‘त्या’ मु्द्द्यावर केंद्रीय मंत्री नेमके काय म्हणाले..
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडूनही काहीच प्रयत्न होत नाहीत. इंधनास जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला होता. मात्र, या प्रस्तावास बहुतांश राज्यांनी विरोध केला. त्यामुळे हा निर्णय घेता आला नाही. जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आले असते तर किंमती 20 ते 25 रुपयांनी कमी झाल्या असत्या. आता मात्र तसे शक्य नाही. केंद्र सरकारने देखील राज्यांनाच जबाबदार धरले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
देशातील राज्ये इंधनास जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार नाहीत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगाल राज्यात टीएमसी सरकार जास्त कर आकारते त्यामुळे तेथे पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत, असे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 32 रुपये कर आकारते. ज्यावेळी जागतिक बाजारात इंधनाचा दर 19 डॉलर प्रति बॅरल असा होता त्यावेळी सुद्धा सरकार 32 रुपये कर घेत होते. आणि आताही तितकाच कर घेतला जात आहे. असे असताना आता इंधनाचे दर 75 डॉलर प्रति बॅरल असे झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. इतकेच नाही तर विरोधी पक्षांनी अनेक वेळा आंदोलनेही केली. मात्र, सरकारने इंधनाचे दर कमी केले नाहीत. कोरोना काळात खर्च वाढला.
तसेच अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याने त्यासाठी जास्त पैसे खर्च होत असल्याचे सरकारचे मंत्री सांगत होते. तसेच राज्यांनी इंधनावरील कर कमी करावेत, असेही आव्हान दिले जात होते. मात्र राज्यांनी कर कमी केले नाहीत. आणि केंद्र सरकारनेही किंमती कमी केल्या नाहीत. काँग्रेसमुळेच सध्या देशात इंधनाच्या किंमती वाढत असल्याचा आरोपही केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वेळा केला होता. त्यानंतर इंधनास जीएसटी कक्षेत आणण्यास राज्ये तयार नाहीत त्यामुळे केंद्र सरकारला निर्णय घेता येत नाही. आणि यामुळे इंधनाचे दर कमी होत नाहीत, असे स्पष्टीकरण आता केंद्रीय मंत्री देत आहेत.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.