केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! ‘डीए’ मध्ये वाढीसह मिळणार ‘हे’ फायदे; पहा, सरकारने कोणते निर्णय घेतलेत ?
नवी दिल्ली : देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मिळणार आहे. जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. डीए आणि डीआर वाढीबरोबरच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी इतर काही लाभांचीही घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरणार आहे.
देशात आता सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच फायदा होणार असल्याने कर्मचारी वर्गात सध्या आनंदाचे वातावरण आहे. या व्यतिरिक्त आणखीही काही फायद्याचे निर्णय सरकारने घेतले आहेत. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची मर्यादा 45 हजारांवरुन 1.25 लाख केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मानजनक मदत देण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
घरे बांधण्याची इच्छा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज देण्यासाठी जून 2020 मध्ये हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स सुरू करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल आणि ई-मेलवर थेट एसएमएस, ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शन स्लिप देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना डीए, डीआर व्यतिरिक्त वाढीव घरभाडे भत्ता सुद्धा मिळणार आहे. महागाई भत्ता जर 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर घरभाडे भत्त्यात आपोआप वाढ होते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.