Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात आजही घसरण कायम; पहा, आज काय आहेत सोने आणि चांदीचे बाजारभाव

नवी दिल्ली : देशात आज गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात घसरणीचा ट्रेंड कायम होता. आज तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोने मार्केटमध्ये दिसून आला. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचे दर 0.75 टक्क्यांनी कमी झाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बुधवारी संपलेल्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर आज सोन्याचे भाव कमी झाले. स्पॉट सोने 0.3% घसरून 1,762.33 डॉलर प्रति औंसवर होते. डॉलर निर्देशांक एक महिन्याच्या उच्चांकावर राहिला, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली.

Advertisement

आज ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचे भाव जवळपास 349 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सध्या 46 हजार 323 रुपये प्रति दहा ग्रॅम असे सोन्याचे भाव आहेत. डिसेंबर वायदा चांदी 632 रुपये किंवा 1.03 टक्क्यांनी घसरून 60,548 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 0.3 टक्क्यांनी घसरून 22.60 डॉलर प्रति औंस झाले आहेत. काल बुधवारी मात्र दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले होते. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 196 रुपयांनी वाढून 45,746 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याप्रमाणे चांदीही वाढली. एक किलो चांदीचा भाव 319 रुपयांनी वाढून 59,608 रुपये प्रति किलो झाला.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्यास मागणी वाढण्याची शक्यता आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात मागणीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे घडले तर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply