हायवे प्रोजेक्टमध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेय ‘हे’ उत्तर
नवी दिल्ली : देशात रस्ते आणि महामार्गांचे बांधकाम वेगात सुरू आहे. देशातील या हायवे प्रोजेक्ट मध्ये चिनी कंपन्या गुंतवणूक करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रश्नावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. देशातील हायवे प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांनी काही गुंतवणूक केली आहे किंवा नाही, असा प्रश्न गडकरी यांनी विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले आहे.
अलीकडच्या काही वर्षात चीनमधील कोणत्याही कंपनीने भारतातील हायवे प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केलेली नाही, असे गडकरी यांनी सांगितले. मागील वर्षात गलवान घाटीमध्ये चीन आणि भारतात संघर्ष उडाला होता. त्यानंतर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याची योजना भारत सरकारने आखली होती. अनेक चायनीज मोबाइल अॅपवर बंदी घातली गेली. तसेच देशातील हायवे प्रोजेक्टमध्येही चिनी कंपन्यांवर बंदी घातली गेली. त्यानंतर एकाही चिनी कंपनीने भारतातील हायवे प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केलेली नाही. असे गडकरी यांनी सांगितले. याबाबत आधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
सद्यस्थितीत भारताने आयात कमी करुन निर्यात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यानुसार आता केंद्र सरकार नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशभरात सध्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. महामार्गांप्रमाणेच राज्य मार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेही होत आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आधिक काळजी घेण्यात येत आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या कामकाजात सुधारणा होत असून देशभरात या कामाने वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.