Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने कंपन्यांची चांदी; गुंतवणूकदारांनीही केलीय बक्कळ कमाई; पहा, कसा बदललाय ट्रेंड

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील दूरसंचार क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाचा जबरदस्त फायदा टेलिकॉम कंपन्यांना होताना दिसत आहे. टेलिकॉम क्षेत्रास पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचा ट्रेंड सुरू आहे. आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी एमटीएनएल, व्होडाफोन-आयडिया सारख्या दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही बक्कळ कमाई केली आहे.

Advertisement

याआधी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील दूरसंचार क्षेत्रात 100 टक्के एफडीआय गुंतवणुकीस मंजुरी देण्यात आली. तसेच कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर देयकांवर 4 वर्षे स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने एकूण 9 संरचनात्मक सुधारणांना मंजुरी दिली आहे. याशिवाय 5 प्रक्रिया सुधारणांना मंजुरी देण्यात आली. टेलिकॉम कंपन्यांना समयोजित सकल महसूल अर्थात AGR पेमेंटवर 4 वर्षांची सवलत सुद्धा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार कंपन्यांकडून स्पेक्ट्रम देयके भरण्यास स्थगिती मंजूर केली आहे. या कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर थकबाकीवर 4 वर्षांची स्थगिती दिली जाईल. अशा पद्धतीने मंत्रिमंडळाने एकूण 26 हजार 058 कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेस मंजुरी दिली आहे.

Advertisement

दूरसंचार मदत पॅकेजच्या घोषणेचा सर्वात जास्त फायदा आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन-आयडियाला या कंपनी मिळाला आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 15 टक्क्यांपर्यंत वाढले. ट्रेडिंग दरम्यान स्टॉक 14.89 टक्क्यांनी वाढून बीएसई वर 10.26 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 29,482.51 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Advertisement

त्यानंतर, देशातील दुसरी मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या शेअर्समध्येही वाढ नोंदवण्यात आली. आज हा शेअर बीएसईवर 743.90 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. एअरटेलचा शेअर दोन दिवसात 7.17 टक्क्यांनी वाढला आहे. व्होडाफोन-आयडियाचा हिस्सा वाढल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4,511.51 कोटी रुपयांची वाढ झाली. मंगळवारच्या 8.69 रुपयांच्या बंद किंमतीला कंपनीचे मार्केट कॅप 24,971 कोटी रुपये होते.

Advertisement

सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलच्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 32,000 कोटींनी वाढली आहे. व्होडाफोन-आयडियाच्या गुंतवणूकदारांना 4,511.51 कोटी रुपयांचा नफा मिळाला आणि ज्यांनी एअरटेलच्या शेअर्समध्ये पैसे ठेवले त्यांना 27,350.3 कोटी रुपयांचा नफा मिळाला.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply