Take a fresh look at your lifestyle.

National Engineers Day : अर्र.. ‘इतके’ टक्के इंजिनीअर आहेत नालायक..! पहा कितीने वाढत्येय बेरोजगारी

पुणे : कोरोनामुळे संपूर्ण जगात एकाच वेळी अनेक बदल दिसून येत आहेत. शिक्षण, औषध आणि तंत्रज्ञानात सर्वात मोठा बदल होणार आहे. कोविडमुळे भारतासह संपूर्ण जगात बेरोजगारी झपाट्याने वाढली आहे. लाखो लोकांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे, अशा काळात फक्त कौशल्य आणि तंत्रज्ञान लोकांना त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत करू शकते. त्यादृष्टीने आता पालक आणि तरुणांनी नियोजन करून मार्ग काढणे अपेक्षित आहे. अशावेळी आज आपण राष्ट्रीय अभियंता दिन यानिमित्ताने इंजिनीअरिंग क्षेत्रात नेमके काय चालू आहे हे पाहूया.

Advertisement

एका सर्वेक्षणानुसार देशात इलेक्ट्रीशियन फिटर आणि प्लंबरची मागणी खूप जास्त आहे. तर तुलनेने अभियंत्यांची मागणी खूप कमी आहे आणि त्यासाठी पुरवठा खूप जास्त आहे. 12 वी पास इलेक्ट्रिशियनचे सरासरी वेतन दरमहा 11300 रुपये आहे, तर पदवी अभियंत्याचे सरासरी वेतन दरमहा 14800 रुपये म्हणजे 3500 रुपये अधिक आहे. इलेक्ट्रिशियन प्लंबर, तंत्रज्ञ यांचे वेतन गेल्या सहा वर्षांत वाढले आहे. तर आयटी इंजिनीअर्सचे एंट्री लेव्हल वेतन जवळपास सारखेच आहे.

Advertisement

अहवालानुसार, पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आयटी बूम झाली तेव्हा खूप मागणी होती. मागच्या 10 वर्षात मागणी वाढली नसली तरी अभियांत्रिकी पदवीधर मागणीपेक्षा कित्येक पटीने जास्त बाहेर येत आहेत. देशात दरवर्षी सुमारे 15 लाख अभियंते बनवले जातात. परंतु त्यापैकी फक्त 4 लाख लोकांनाच नोकरी मिळते, बाकीच्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. बेरोजगारीत सातत्याने वाढ झाल्यामुळे, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहू लागल्या आहेत. तांत्रिक शिक्षणात देशातील बहुतेक राज्यांमध्ये 60 ते 70 टक्के जागा रिक्त आहेत. ही आकडेवारी देखील चिंताजनक आहे. कारण परिस्थिती वर्षानुवर्षे फक्त वाईट होत आहे. एकीकडे पंतप्रधान देशासाठी ‘मेक इन इंडिया’ बद्दल बोलत आहेत, तर दुसरीकडे देशातील तांत्रिक आणि उच्च शिक्षणाची स्थिती बिकट आहे.

Advertisement
नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपन्यांच्या (NASSCOM) सर्वेक्षणानुसार आकडेवारी :
75% तांत्रिक पदवीधर नोकरीयोग्य नाहीत
या अभियंत्यांची भरती केल्यानंतर आयटी उद्योग प्रशिक्षणावर सुमारे अब्ज डॉलर्स खर्च करतो
उद्योगाला आवश्यकतेनुसार अभियांत्रिकी पदवीधर मिळत नाहीत
पदवी आणि कौशल्य यातील दरी वाढली आहे
साहजिकच, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित अभियांत्रिकी बेरोजगारांची संख्या देखील देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक स्थिरतेसाठी चांगली नाही

 

Advertisement

भारतीय शैक्षणिक अभ्यासक्रम 20 वर्षे जुने आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगानुसार शिक्षण मिळत नाही. या कारणास्तव अभियांत्रिकी पदवीधरसाठी नोकरी मिळवणे आज सर्वात आव्हानात्मक काम बनत आहे. उद्योग आणि संस्थांमध्ये एक समान व्यासपीठ स्थापित करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. उद्योगांच्या पायात बेड्या टाकण्यासह शिक्षण क्षेत्रात जुने तेच सोने असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचे दुष्परिणाम पुढील कालावधीत भारत देशाला आणखी भोगावे लागतील असेच म्हटले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply