नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना बरोबरच महागाईचे संकट आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. मागील दोन ते महिन्यांपासून महागाईत मोठी वाढ झाली आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आताही ऑगस्ट महिन्यात महागाई थोडी कमी होऊन या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.30 टक्के राहिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जुलै महिन्यात महागाई दर 5.59 टक्के होता. तसेच मागील वर्षात म्हणजेच ऑगस्ट 2020 मध्ये 6.69 टक्के इतका महागाई दर होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, देशातील महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात खाद्य पदार्थांची महागाई 4 टक्क्यांवरुन 3.11 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. महिनाभराच्या काळात भाजीपाल्याच्या किमतीत 11.7 टक्के कपात झाली होती. त्यामुळे महागाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळाली. रॉयटर्स या न्यूज संस्थेने 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान केलेल्या सर्वेनुसार, ऑगस्ट महिन्यात महागाई 5.60 टक्के राहिल असे म्हटले होते.
देशात सध्या पेट्रोल, डिझेलसह गॅस टाकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने सहाजिकच देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. महागाई कमी होण्यासाठई आधी इंधनाचे दर कमी होणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. परिणामी, देशांतर्गत अन्य महागाई सुद्धा कमी होत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. रिजर्व बँकेलाही आवश्यक आदेश दिले आहेत.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.