बाळूमामांचा अवतार भासवणारा भोंदू मनोहर मामा पोलिसांच्या ताब्यात…वाचा का झाली अटक…
त श्री बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासवत बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्याने गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो, असे सांगितले. तर बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा खाण्यास दिले.
बारामती: संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवत मनोहर मामा नावाने ओळख असलेला मनोहर भोसले अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. पुणे ग्रामिण पोलिसांनी फरार असलेल्या मनोहर भोसलेच्या साताऱ्यात मुसक्या आवळल्या.
संत श्री बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासवत बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्याने गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो, असे सांगितले. तर बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा खाण्यास दिले. त्यानंतर विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करीत जीविताची भीती घालून तब्बल 2 लाख 51 हजार रूपये उकळले. ही फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खरात यांनी पैसेे परत मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
करमाळा तालुक्यात मनोहर भोसले मनोहर मामा नावाने वावरत होता. तर त्याने राजकारण्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत आपले भक्तगण तयार केले होते. त्याच काळात मनोहर भोसलेच्या विरोधात करमाळा येथे एका महिलेने बलात्काराची फिर्याद दिली. मात्र त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्त आणि अधिकारी भक्तगण असल्याने त्याच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत सातारा येथून पुणे ग्रामिण पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस स्थानकात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व अनिष्ठ प्रथा व जादुटोणा उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यास बारामती पोलिस स्टेशनला आणण्यात येणार आहे.