Take a fresh look at your lifestyle.

बाप रे..! एका नारळाची किंमत चक्क लाखात; वाचा नेमकं कारण…

नारळाची बोली एक हजारापासून सुरू होते. तर दरवर्षी नारळाची बोली दहा हजारांच्या आसपास लागत होती. मात्र यंदा बोली एक हजारपासून सुरू झाली आणि एका मिनिटात तब्बल लाखांवर पोहचली.

बंगळूर : आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या काही घटनांवर सहज विश्वास बसतो. तर काही घटनांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं. कारण आपल्या देशात देवाची पुजा करण्यासाठी, आजारी असताना पाणी पिण्यासाठी नारळ खरेदी केला जातो. तर त्याची किंमत अवघी 40 ते 50 रूपयांदरम्यान असते. मात्र आपल्या देशात एका नारळाची किंमत तब्बल लाखांमध्ये मोजली गेली आहे.

Advertisement

कर्नाटक राज्यातील बगलकोट जिल्ह्यातील जमखंडी परिसरातील चिक्कालकी गावात मलिंगरायाचे 12 व्या शतकातील मंदिर आहे. तर या मंदिरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी बीरलिंगेश्वराची यात्रा भरते. कारण मलिंगराया हा नंदीचा अवतार मानला जातो. तर हे भगवान शंकराचे रूप. त्यामुळे त्यांच्या सिंहासनावर अर्पण केलेला नारळ अत्यंत दिव्य आणि शुभ मानला जातो. त्यामुळे त्या नारळाची बोली लागत असते.

Advertisement

मंदिर समितीचे बासू कडली यांनी सांगितले की,  नारळाची बोली एक हजारापासून सुरू होते. तर दरवर्षी नारळाची बोली दहा हजारांच्या आसपास लागत होती. मात्र यंदा बोली एक हजारपासून सुरू झाली आणि एका मिनिटात तब्बल लाखांवर पोहचली. एकापाठोपाठ नारळाची बोली लागत होती. त्यात एका भाविकाने नारळाची किंमत तीन लाख लावली होती. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असणारांना बोली याच किंमतीवर थांबेल असे वाटत असताना महावीर नावाच्या व्यक्तीने नारळाची किंमत तब्बल 6.5 लाख लावली आणि नारळ खरेदी केला.

Advertisement

नारळाच्या खरेदीनंतर महावीर यांनी सांगितले की, एका नारळासाठी इतकी मोठी किंमत मोजल्याबद्दल लोक मला मुर्ख किंवा अंधश्रध्दाळू समजतील. परंतू माझ्या नजरेत ही भक्ती आणि समर्पण आहे. कारण जेव्हा माझी प्रकृती खालावली होती, व्यावसायात तोटा झाला होता, तेव्हा मी भगवान मलिंगरायाला प्रार्थना केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच माझे सगळे त्रास संपले. त्यामुळे माझी भगवान मलिंगरायावर श्रध्दा आहे. आता मी हा दैवी नारळ माझ्या घरात ठेवीन आणि रोज त्याची पुजा करणार आहे, असे महावीर यांनी म्हटले.

Advertisement

तर मंदिर समिती विकास आणि धार्मिक कामांसाठी या पैशाचा वापर करेल, असे कडली यांनी सांगितले. मात्र नारळाची बोली 6.5 लाख इतक्या विक्रमी किंमतीवर जाईल, याचा विचारही केला नव्हता असेही कडली यांनी म्हटले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply