Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलनावर कोर्टाने म्हणालेय ‘असे’; पहा कशामुळे झालीय या महत्वाच्या मुद्द्यावर सुनावणी

दिल्ली : दिल्लीच्या परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशद्रोही ठरवून केंद्रातील सत्ताधारी भाजपने सपशेल दुर्लक्षित केले आहे. आता हे आंदोलन चालू असतानाच अनेकांना इतर राजकीय मुद्द्यांमध्ये या शेतीच्या कायद्यांचा आणि त्याचे होणारे संभाव्य परिणाम यांचाच विसर पडलेला आहे. मात्र, आज त्याबाबत महत्वाची बातमी आलेली आहे.

Advertisement

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रस्ते अडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला तोडगा काढण्यास सांगितले आहे. नोएडा आणि दिल्ली दरम्यानचा रस्ता पूर्ववत करण्यासाठी निर्देश मागण्यासाठी न्यायालय नोएडाच्या रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. म्हणजेच कोर्टाने याप्रकरणी आता एका व्यक्तीच्या अडचणीमुळे का होईना लक्ष घातलेले आहे. आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply