Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आणि झाले आत्मज्ञान; पहा गुगलच्या खिशातून डॉलर काढायला शिकलेल्या शेतकरी पुत्रांची भन्नाट कथा

वाचक मित्र-मैत्रिणींनो, सगळ्या समीकरणांना छेद देणारी आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांनी निर्माण केलेल्या वेगळ्या साम्राज्याची ही खास गोष्ट आहे. त्यामुळे काळजीपूर्वक वाचा आणि शेअर करा. कारण, आम्ही सांगतोय ते वास्तव आहे. ग्रामावार्ता या आपल्या लोकप्रिय युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध झालेली मुलाखत वाचकांच्या आग्रहाने आम्ही शब्दबद्ध केली आहे तर, वाचा गुगल आणि फेसबुकच्या खिशातून डॉलर काढणाऱ्या आणि मराठी मनोरंजन विश्वात प्रमोशनचा सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण केलेल्या गणेश काटकर आणि दिनेश हिवरकर (संस्थापक, स्टार मराठी) यांची प्रेरणादायी अशीच भन्नाट मुलाखत. (Interview of Ganesh Katkar & Dinesh Hiwarkar The Founder of StarMarathi.in  Facebook and Youtube Channel tell you how to make dollar on online platform / social media and collect it form google and other sources)

Advertisement

शब्दांकन : विनोदकुमार सूर्यवंशी (कार्यकारी संपादक, कृषीरंग)

Advertisement

पुढे ही मुलाखत शब्दबद्ध करताना जरा वेगळा ढंगात केली आहे. कारण, ही दोन शेतकरी कुटुंबातील तरुणांची फ़क़्त यशोगाथा नाही, तर ही आहे एक प्रेरणादायी अशीच स्टोरी. अगदी एखाद्या चित्रपट किंवा वेबसिरीजमध्ये चित्रबद्ध करण्याजोगा असाच दोघांचा प्रवास आहे. ‘स्टार मराठी’वाल्या युट्युबरची ही कथा ग्रामीण तरुणांना तंत्रज्ञानाच्या युगात किती मोठी संधी आहे याचीच साक्ष पटवून देणारी आहे. एकाची कल्पकता आणि दुसऱ्याचा तंत्रज्ञानातील हातखंडा एकत्र आला आणि त्याला इतर स्टार कलाकारांनी हातभार लावला तर काय किमया होऊ शकते याची ही सक्सेस स्टोरी आहे.

Advertisement

Advertisement

याबाबत माहिती देताना गणेश काटकर सांगतात की, स्टार मराठी वाढविण्यामध्ये दिनेशचा हिवरकर यांचा  सिंहाचा वाटा आहे. आम्ही दोघांनी मिळून Nexon Mediatech Pvt.Ltd  कंपनीची  स्थापन केली आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून पंचवीस –  तीस  लोकांना रोजगार उपलध्द करून दिला आहे. दिनेश सर्व Technical काम नागपूरहून सांभाळतो आणि मी (गणेश) पुण्यामधून काही जबाबदारी सांभाळतो. आम्ही दोघेही अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहोत. शेतीत भविष्य नाही असे नाही. परंतु, शेतीसह इतर क्षेत्रातही ग्रामीण तरुणांनी आता सक्रीय होण्याची गरज आहे. Nexon Mediatech Pvt.Ltd . म्हणजे माझ्यासह सर्वच पार्टनर्सच्या कष्टाचे फळ आहे.

Advertisement

गणेश पुढे म्हणाले की, आम्ही प्रमोशन केलेल्या वेब सिरीज हीच आमची खरी ओळख आहे. गावाकडच्या गोष्टी, चांडाळ चौकडीच्या करामती, मराठी शाळा, उचापत्या, एक गाव तेरा भानगडी, विनायक माळी, ऑस्करवाडी अशा बऱ्याच वेबसिरीज आमच्या माध्यमातून हिट झाल्या. महाराष्ट्रासह जगभरातून या मालिका आता पाहिल्या जात असल्याने एकूणच कामाचे समाधान आहे.

Advertisement

स्टार मराठी युट्युब चॅनेलवरील गावरान मेवा, लैला मजनु, जांगडगुत्ता, तुमच्यासाठी काय पण आणि चालू नवरा खतरनाक बायको या वेब सिरीजला मिळणारा प्रतिसाद हीच आमची खरी कमाई आहे. दिनेशच्या तंत्रज्ञानातील कामामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने मोठी उडी घ्यायला मदत झाली. मग आम्ही एकदा पुढे निघाल्यावर पाठीमागे राहण्याचा प्रश्नच मिटला. त्यामुळेच बबन, मन की बात, मस्का, अ ब क ग*, झी स्टुडिओचे कागर, दोस्तीगिरी, लक्की, मुंबई-पुणे-मुंबई 3, रॉकी बाबू, टकाटक, लालबत्ती, येरे येरे पैसा, सैराट, भोंगा असे असंख्य मराठी चित्रपटांचे आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रमोशन करू शकलो, असेही गणेश यांनी म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement
साल : 2010
वेळ : सुखाचा जीव दुःखात घालण्याची
काळ : समाज माध्यमांच्या उदयाचा
ठिकाणी : सेलू तालुका

 

Advertisement

कोणतीही पार्श्वभूमी नाही. कला, माध्यम, साहित्य आणि यांचं व्यावहारिक गणित यातलं ओ की ठो माहीत नाही. शिक्षण बारावी पास असलेल्या एका मुलाने फेसबुक, वेबसाईट बनवून पैसे मिळतात, हे ऐकलं आणि त्यादिशेने प्रवास सुरु झाला. इथं डॉलरचे रुपयांमध्ये किती होतात, या गणिताची जुळवाजुळव करायचे वांधे… मात्र याच्या-त्याच्या मदतीने, पैसे जास्त घालून या मुलाने पहिली वेबसाईट बनवली. मग एक महाशय भेटले ते म्हणाले, असल्या वेबसाईट कुणी बघत नाही, वाचत नाही. दुसरी वेबसाईट कर… मग या मुलाने पुन्हा पैशाची जुळवाजुळव करून दुसरी वेबसाईट बनवली. तीही फेल गेली. अशी एकेक करत तब्बल दहा वेबसाईट त्याने बनवल्या. सगळ्यात अपयश आलं. आता तर वेबसाईटसाठी हजार रुपयांचा खर्च करण्यासाठीही पैसे नव्हते.

Advertisement
कट टू
साल : 2017
वेळ : चांगली
काळ : केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे, यावर विश्वास असणारा
ठिकाण :- सेलू ते पुणे व्हाया नगर… मुंबई, गोवा, दिल्ली.

 

Advertisement

तोच मुलगा… ज्याचा व्याप आता विस्तारला आहे. सैराट (Sairat Marathi Movie) आणि यासारख्या अनेक बड्या चित्रपटांचे सोशल मीडियावर प्रमोशन. केंद्रीय मंत्र्यांच्या कंपन्यांचे सोशल मीडियाचे काम. सपट परिवार चहा (Sapat Pariwar Tea) सारख्या मोठ्या ब्रँडचे काम. आणि अवघ्या महाराष्ट्रात आणि मनोरंजन क्षेत्रात फेमस झालेला स्टार मराठी ब्रँड. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वाधिक लोकप्रिय झालेली ‘गावरान मेवा’सारखी (Gavaran Meva) वेबसिरीज ही. आता Nexon MediaTech Pvt. Ltd. ही त्यांची ओळख बनत आहे. आणि त्याला खंबीर साथ आहे दिनेश हिवरकर यांची.

Advertisement

आता तुम्हाला पाया लक्षात आला असेल आणि कळसही लक्षात आला असेल. मात्र हे सगळं उभा राहण्याचा म्हणजे या मधला जो संघर्षाचा जो काळ होता, तो समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. 2010 ला पहिली वेबसाईट बनवलेली. आज त्यांची अकरावी वेबसाईट अखंड महाराष्ट्र वाचतो. मनोरंजन क्षेत्रात ‘स्टार मराठी’ (www.starmarathi.in) STAR Marathi हे नाव माहिती नसलेला माणूस शोधून सापडणार नाही.

Advertisement

Advertisement

गणेश हा एकदम गावाकडचा खेडवळ मुलगा तालुक्याच्या ठिकाणी येतो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान टाकतो. मग हळूहळू गरज पाहून मोबाईल शॉपी पण टाकतो. काही दिवसांनी फेसबुकविषयी माहिती होते, तिथून पैसे मिळतात हेही कळतं. मग हा मुलगा वेबसाईट काढण्याकडे वळतो. सतत अपयशी होतो मात्र जिद्द, चिकाटी याच्या जीवावर काम चालू असते. मन कितीही चिकट असले तरी सगळं उभा करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी खूप पैसा लागतो. तो कुठून उभा करणार? मात्र ज्याला करायचं असतं तो कसंही करून करतोच. त्यासाठी जीवाभावाचे असे पार्टनर मिळाले. दिनेश हिवरकर यांची साथ आणि बरोबरच चैतन्य गायकवाड, वैभव जाधव, रमेश काटकर, विनोद पवार, राम मोरे यांचा विश्वासपूर्ण मदतीचा हात याच्या मदतीने गणेश काटकर यांनी यशाचे शिखर गाठण्याचा मार्ग प्रशस्थ केला.

Advertisement

विशेष मोठं काही व्हिजन नाही, सोबतीला कुणी श्रीमंत असा मित्र नाही, पैशाचा बॅकअप नाही. मात्र तरीही ‘काहीतरी करून दाखवायचंय’ हा एकच ध्यास आज त्यांना महाराष्ट्रात घेऊन पोहोचला आहे. या मनोरंजन क्षेत्रातील कचकड्याच्या दुनियेत ‘स्टार मराठी’ हे नाव आपले पाय घट्ट रोवून उभा आहे. आणि या स्टार मराठीचा पाया म्हणजे गणेश काटकर आणि दिनेश हिवरकर .

Advertisement

2010 साल चालू होतं. करायचं खूप काही होतं. पण नेमकं कसं करायचं? हे कळत नव्हतं. कुणीही यायचं जमेल तसे सल्ले द्यायचं. नेमकी आणि खरी माहिती कुणी देत नव्हतं. त्यातही या पोराची भाषा, वागणं, बोलणं सगळंच एखाद्या किरकोळ मुलासारखं आणि हा मुलगा डिजिटल मीडियाचा “स्टार” होण्याची भाषा करायचा. अपयश येऊनही हा नवनवीन फंडे आजमावून बघत राहिला. सुरुवातीला “स्टार मराठी” नावाचं फेसबुक पेज बनवलं. त्याचे लाईक्स वाढत नव्हते. इकडून-तिकडून कुठल्याही पेजवरून फोटो, व्हिडीओ टाकण्याचे काम चालू होते. तरीही विशेष काही प्रतिसाद मिळत नव्हता. मग 4-5 मित्रांनी एकत्र येऊन पैसे काढले. पेज बुस्ट केले. मग अपेक्षित रिस्पॉन्स आला. मग हळूहळू स्वतःचे डिझाईन आणि चांगले कंटेंट पोस्ट करण्याचे काम सुरू झाले. हळूहळू चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही महिने गेले पण आता लाखो लोकांपर्यंत पेज पोहोचू लागले. सगळीकडे अपयशाने घेराव घातला असताना कुठेतरी यशाची किनार दिसू लागली होती. पण फक्त फेसबुक पेजचेच काम चालू नव्हते. इन्स्टाग्राम, युट्युब या सारख्या भानगडीचाही अभ्यास सुरू होता. मात्र आता ओळखी झाल्याने नेटवरून आणि लोकांकडून या मीडियाची खरी माहिती मिळू लागली. मग इन्स्टाग्रामवर काम सुरू झाले. मग युट्युब चॅनलही सुरू केले. पण शूटिंग कोण करणार? स्क्रीप्ट कोण लिहिणार? कॅमेरा, साउंड, लाईट असे अनेक प्रश्न तोंडासमोर आ वासून उभे होते. मात्र   जोडीदाराच्या साथीने यावरही मात करण्याचे ठरले.

Advertisement

Advertisement

आपण खेड्यातले आहोत, तर खेड्यातील लोकांचाच कंटेंट युट्युबवर दाखवण्याचे ठरले. शूटिंगची तयारी, नवखे कलाकार नवीन क्षेत्र… सगळं काही नवीन होतं. इथेही पुन्हा फसगत होण्याची शक्यता होतीच. आणि झालीही… मात्र तरीही ‘शो मस्ट बी गो ऑन’ असे म्हणत काम सुरूच राहिले. बघता बघता युट्युबवरही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नवीन क्षेत्र असतानाही यांच्या मराठी वेबसिरीजला ग्रामीणसह शहरी भागातील जनतेनेही डोक्यावर घेतले. हिंदीतील मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसला जे जमले नव्हते ते स्टार मराठीच्या टीमने करून दाखवले होते. कोटींमध्ये विव्ज मराठी चॅनलला मिळू शकतात, यावर कुणाला सांगून विश्वास बसला नसता. मात्र हे डोळ्यांनी दिसत होते. आता हाच गावाकडची शूटिंग करणारा मुलगा लाखो रुपयांची निर्मिती असलेली हिंदी वेबसिरीजची निर्मिती करत होता. MX प्लेयर सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह काम करत होता.

Advertisement

मग हळूहळू प्रमोशनची कामे सुरू झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युबवर मग त्यांनी अजून मोठे काम केले. इतरही क्षेत्रातील ब्रँड प्रमोशनची कामे मिळवली. स्टार मराठीची आता मनोरंजन क्षेत्रपलीकडे ओळख निर्माण झाली होती. राजकीय क्षेत्रातही थेट केंद्रीय मंत्र्यांचीही कामे मिळवली. सपट परिवार चहासारख्या ब्रँडचेही काम केले.

Advertisement

एक गांवढळ आणि फक्त बारावी पास असलेला, या क्षेत्राची काहीच ओळख नसलेला गणेश काटकर हा अवली माणूस आजच्या घडीला डॉलरमध्ये उत्पन्न घेतो, हे अविश्वसनीय आहे. मात्र हे खरं आहे. स्टार मराठीची स्थापना करताना आपण गावाकडच्या लोकांना, सामान्य कलाकारांना ‘स्टार’ बनवू हे त्याच्या कधी स्वप्नातही आलं नसेल. मात्र आज हे खरं ठरत आहे.

Advertisement

फेसबुक, युट्युबवर अगदी सामान्य माणसाला पैसे कमावण्याची संधी आहे आणि भविष्यातही असेल. माध्यमे जसे की अँड्रॉइड मोबाईल सामान्य माणसाच्या हातात आल्याने ही क्रांती होऊ शकली आहे, हे ठामपणे गणेश काटकर सांगतात. युट्युबवर तर लोक काहीही करून पैसे कमावतात. तुमच्याकडे जे स्किल/कला आहे, ते लोकांसमोर आणा आणि पैसे कमवा. थोडा वेळ लागेल पण मग नंतर मागे वळून बघण्याची गरज भासत नाही, असाच स्वतःचा अनुभव ते सांगतात.

Advertisement

तुम्ही कॉमेडी करा, सिरीयस कंटेंट द्या, काहीही करा पण वेगळेपणा आणि सातत्य ठेवा मग या डिजिटल मीडियाच्या जगात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असेही ते ठामपणे सांगतात. गणेश काटकर यांची ही धडपड आजही चालू आहे. याच क्षेत्रात त्यांना अजून उंच भरारी घ्यायची आहे. ते ही उंच भरारी घेतील, यात शंका नाहीच कारण जो धडपडतो तो कधीच पडत नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply