Take a fresh look at your lifestyle.

तरच दुग्धोत्पादाकांना येणार अच्छे दिन; दुधास एफआरपीच्या कायद्याची गरज

अहमदनगर : उसाप्रमाणेच दुधाला संरक्षित भाव मिळण्यासाठी राज्य सरकारने दुधास एफआरपीचा कायदा लागू करण्याचे आश्वासन अजूनही हवेतच आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या भावनेचा कडेलोट होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून क्रांतीदिनी कळस बुद्रूक व सुगाम बुद्रूक येथे दूध उत्पादकांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Advertisement

दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी संघटना व दूध कंपन्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. एफआरपीनुसार दूध दर लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने प्रस्ताव बनवून महसूल व सहकार विभागात कॅबिनेटकडे अभिप्रायास पाठवला. या बैठकीनंतर दूध दर वाढतील व राज्यात दुधास एफआरपीचा कायदा लागू केला जाईल, असे आश्वासनही दिले. मात्र प्रत्यक्षात दीड महिना उलटून गेला तरीही दूध दर वाढवण्यात आले नाही, याकडे काॅम्रेड डॉ. अजित नवले यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

उलट कोरोना काळात लाॅकडाऊनचा कांगावा करीत राज्यातील दूध खरेदीदार कंपन्यांनी दुधाचे दर १५ रुपयांनी पाडून शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप नवले यांनी केला आहे. विजय वाकचौरे, राजेंद्र भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे, प्रकाश देशमुख, सुनील देशमुख, बाबाराजे देशमुख, माणिक देशमुख, बापूसाहेब वाकचौरे, प्रदीप देशमुख, रवींद्र जगदाळे, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब उगले, डॉ. अशोक ढवळे, श्रीकांत करे, दादा गाढवे, सुधीर रंधे, उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, कविता वरे, दीपक वळे, नंदू रोकडे, जोतिराम जाधव, अमोल नाईक, धनंजय धोरडे, अमोल गोर्डे, अमोल नाईक, सुदेश इंगळे, रमेश जाधव, रामदास वदक, अशोक पटेकर, विकास बगाटे, सूर्यकांत काणगुडे, विजय वाकचौरे, राजू भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

दूध व्यवसायाला एफआरपी, प्रक्रिया व विक्री प्रक्रियेतील उत्पन्नात हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंगचे कायदेशीर संरक्षण लागू करा. एक राज्य एक ब्रँड हे धोरण स्वीकारा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या, दूध संस्थांना प्रमाणित मिल्को मिटर वापर बंधनकारक करा व मिल्कोमिटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमा. पशु विमा योजना सुरू करा अशा मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply