Take a fresh look at your lifestyle.

आणि तेही उठले शेतकऱ्यांच्या मुळावर; पहा नेमका काय प्रकार घडलाय आंदोलकांबाबत

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदाेलन चालू असतानाच या शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दिल्ली : कित्येक महिने झाले आंदोलन चालू असूनही त्याकडे लक्ष देण्याची फुरसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दाखवलेली नाही. त्यामुळे आंदोलन किती दिवस चालणार हा प्रश्न कायम असतानाच आता इतरही काही घटक आंदोलक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत. त्याचाच मोठा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे.

Advertisement

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदाेलन चालू असतानाच या शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण पंजाब राज्यात वीज जनित्र चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आलेल्या असून त्यांनी हजारो जनित्र चोरून नेऊन त्या शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत शेतामधील वीज जनित्र चोरी करण्याच्या घटना त्या राज्यात वेगाने वाढत आहेत. पॉवरकॉमच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या ६ महिन्यांत (१ जानेवारी ते ३० जून २०२१) ६१९५ जनित्र चोरीस जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. २८ कोटी ५६ लाख ३६ हजार ८३८ रुपयांचे नुकसान यामुळे झाल्याचा दावा विभागाने केला आहे.

Advertisement

मागील सहा महिन्यांत जनित्रातून तेल चोरीच्या ४३३८ घटना नोंद झाल्या असून बाजारात हे तेल सुमारे १२०० रुपये लिटर विकले जात असल्याने चोरांना अच्छे दिन आलेले आहेत. जनित्राला लोखंडाच्या ग्रिलने वेल्डिंग करूनही चोरटे गॅस कटरने ग्रिल कापून चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ठरत आहेत. परिणामी या राज्यात शेतीच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply