Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तलाठ्यांच्या भेटीला बसणार चाप; जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात झालाय ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल

पुणे : दुय्यम उपनिबंधकांकडे होणारे ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतानाच्या नियमात आता महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. त्यामुळे यापुढे आता मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार झाल्यानंतर नोंदीसाठी तलाठ्याकडे जाण्याची अजिबात आवश्यकता राहिली नाही.
जमिनीचे व्यवहार करताना सरकारला कर देतानाच तलाठी आणि सर्कल अधिकारी यांचे हात ओले करण्याचा प्रघात महाराष्ट्र राज्यात आहे. मात्र, आता त्यालाच चाप लावण्याचे महत्वाचे कार्य राज्य सरकारने करून दाखवले आहे. त्यामुळे आता तलाठ्यांच्या भेटीला जाऊन होणारा मनस्ताप आणि खिसे मोकळे करण्याचा प्रकार कितपत थांबतो की महसूल प्रशासनाची पैसेखाऊ यंत्रणा यातही वेगळा मार्ग काढते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

नव्या नियमानुसार खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आता सातबारा (७/१२) उताऱ्यासह ८-अ खाते उताराही आवश्यक ठरणार आहे. ८ अ उतारा धारण जमिनीची नोंदवही यामध्ये असतो. यामध्ये तकऱ्यांच्या नावावरील एकाच गावाच्या हद्दीत असलेल्या जमिनींची एकाच ठिकाणी नोंद नमूद असते. खातेदाराच्या नावासमोरच ‘८ अ’ची नोंद आल्याने कुणाचा खाते उतारा कुठला याची स्पष्ट कल्पना येते. ऑनलाइनमुळे तलाठ्याकडे जाण्याचीही आता नसेल गरज उरणार नाही.

Advertisement

योग्य खाते क्रमांक निवडला नसल्यास सातबारा उतारा खरेदी-विक्रीची नोंद तलाठ्याकडून अद्ययावत होत नसल्याच्या कारणाने आता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार होताच त्याची ऑनलाइन नोंद थेट तलाठ्याकडे येऊन पडते. तलाठीही केवळ खाते क्रमांकाची खात्री करून नोंद मंजूर करून घेतो. त्यामुळे आता मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार झाल्यानंतर नोंदीसाठी तलाठ्याकडे जाण्याची अजिबात आवश्यकता राहिली नाही.

Advertisement

Advertisement

Leave a Reply