Take a fresh look at your lifestyle.

‘पतंजली’च्या ‘आयपीओ’ची गुंतवणुकदारांना प्रतीक्षा..! पाहा बाबा रामदेव काय म्हणतात..?

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांची लोकप्रिय कंपनी पतंजलीचा ‘आयपीओ’ लवकरच शेअर बाजारात येणार आहे. गुंतवणूकदारही त्याची आतुरतेने वाट पाहत असून, गुंतवणूकदारांकडून प्रवर्तकांपर्यंत सर्वाधिक संपर्क साधला जात आहे; पण बाबा रामदेव यांच्या मनात काही वेगळेच चालले आहे. एका मुलाखतीत बाबांनी यावर्षी पतंजली कंपनीचा आयपीओ येणार नाही; परंतु या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

Advertisement

‘पतंजली’च्या ‘आयपीओ’साठी गुंतवणुकदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसते. रामदेव बाबा यांनी सध्या सगळे लक्ष ‘रुची सोया’ कंपनीवर केंद्रित केलेले आहे. रुची सोया कंपनीला मोठ्या ‘एफएफसीजी’ कंपनीत रुपांतरित करण्याचा त्यांचा मानस आहे.

Advertisement

आजकाल रुची सोयाच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) संदर्भात ते विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांना भेटत आहेत. रुची सोयाच्या मुद्यावर गुंतवणूकदार चांगली रुची दाखवत आहेत. त्याच्या आधारे किमतीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे बाबांनी सांगितले होते.

Advertisement

रुची सोयाने गेल्या महिन्यात पतंजलीची बिस्किटे आणि नूडल्स युनिट 60 कोटींमध्ये खरेदी केले होते. पतंजली आणि रुची सोया स्वतंत्र उत्पादने देऊ शकतात. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ‘पतंजली’ने 30,000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. पैकी रुची सोयाने विक्रीत 16,318 कोटी रुपयांचे योगदान दिले. आर्थिक वर्ष 2020 मध्ये 25,000 कोटींची विक्री झाली, पैकी रुची सोयानं 13,117 कोटी रुपये दिल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.

Advertisement

‘पतंजली’ने जुलै 2019 मध्ये ‘न्यूट्रेला सोया चंक्स’साठी प्रसिद्ध असलेल्या दिवाळखोर कंपनीला 4,350 कोटींमध्ये विकत घेतले होते. नंतर 27 जानेवारी 2020 रोजी रुची सोयाचे समभाग शेअर बाजारावर सुमारे 17 रुपये प्रति शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. आज हे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 1,377 रुपयांपर्यंत खाली आला असला, तरी तो त्याच्या तुलनेत किमतीपेक्षा 6,476 टक्क्यांनी जास्त आहे.

Advertisement

प्रलंबित 5.79 कोटीचे अनुदान जमा होणार; 844 शेतकऱ्यांना मिळणार लाभ..!
करोनाने झालेय तब्बल 50 लाख मृत्यू; पहा भारताबाबतच्या अहवालात नेमके काय म्हटलेय

Advertisement
Advertisement

Leave a Reply