Take a fresh look at your lifestyle.

चीनचे मराठवाडा कनेक्शन उघड..? औरंगाबाद, बीड, जालन्याच्या दगडांवर डोळा; तस्करीमध्ये बड्यांचा हात..!

औरंगाबाद : जगभरात कोण कशाची कशासाठी तस्करी करेल याचा काहीही नेम नाही. कारण, आपल्या सामान्य लोकांसाठी खूप सामान्य वाटणारी एखादी गोष्ट जागतिक बाजारात खूप मौल्यवान असू शकते. असेच एक रॅकेट मराठवाड्यात सक्रीय आहे.

Advertisement

त्याची पाळेमुळे खोडून काढण्याचे आव्हान आता महसूल विभागावर आहे. मात्र, महसूल विभागाची एकूण ख्याती लक्षात घेता यामध्ये त्यांचाच थेट सहभाग असू शकतो किंवा अगदी बड्यांचा सहभाग असल्यावर हा विभाग हातावर हात देऊन बसून अर्थपूर्ण पद्धतीने शांत राहण्याची शक्यता आहे. याबाबत गावोगावी चर्चेला उत आलेला आहे. सेमी प्रेसियस स्टोन्स हा दगड औरंगाबाद आणि जालना व बीड जिल्ह्यात सापडतो. त्याला चीनमध्ये मोठे मार्केट आहे.

Advertisement

याची भनक लागल्यावर महसूलच्या पथकांनी दोन ठिकाणी छापे टाकून दगडांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे एका व्यक्तीने मुंबईतून तक्र दिल्याने हे प्रकरण उघडकीस आलेले आहे. औरंगाबादसह बीड, जालना, जळगाव भागात एका राजकीय कुटुंबातील व्यक्तीतर्फे काही अधिकारी व गुंडांना हाताशी धरून हे रॅकेट चालवले जाते.

Advertisement

या दगडाची चीनमध्ये तस्करी करणारी एक टोळी सक्रिय असल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. मुंबईतील तस्करांमार्फत चीनमधील व्यापारी औरंगाबादेत येऊन दगडांची किंवा गुजरातेतील खंबात शहरात याची खरेदी करतात.  जिल्हा गौण खनिज अधिकारी अतुल दौड, तहसीलदार निखिल धुळधर यांच्या नेतृत्वातील दोन पथकांनी छापेमारी सुरू केली आहे. डोंगरात जेसीबीने खोदकाम करून हा दगड काढून विकला जातो.

Advertisement

‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा

Advertisement

Advertisement

Leave a Reply