Take a fresh look at your lifestyle.

UP च्या गुप्ता बंधुंच्या ‘त्या’ कारनाम्याने तब्बल 13 लाख भारतीयांवर संकट; पहा कशी आणि कुठे घडलीय ही घटना

मुंबई : व्यावसायिक संबंधातून सरकारसमवेत काम करून चिक्कार पैसे कमावण्याचा प्रकार फ़क़्त भारतात घडतो असेच नाही. जगभरात हा ट्रेंड आहे. मात्र, अशाच ‘उद्योगपती’ असलेल्या गुप्ता बंधुंमुळे तब्बल १३ लाख भारतीयांवर जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आलेली आहे. राष्ट्रवाद आणि स्थानिक विरुध्द बाहेरचे अशा वांशिक संघर्षाचा मोठा झटका आफ्रिकन भारतीयांना बसत आहे. पहा दक्षिण आफ्रिकेत नेमका काय प्रकार घडला आहे तो.

Advertisement

हिंद महासागराशेजारील दक्षिण आफ्रिकेत माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर परिस्थिती युद्धजन्य झाली आहे. या देशातील बर्‍याच भागात लूटमार आणि हिंसाचार चालू आहेत. यात आतापर्यंत सुमारे 72 लोक ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या तीव्रतेमध्ये आता दक्षिण आफ्रिकेत राहणारे 13 लाख मूळ भारतीय असलेले आफ्रिकन नागरिक भरडून निघत आहेत. स्थानिकांनी राष्ट्रवाद हा मुद्दा उपस्थित करून भारतीयांना उपरे ठरवून लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

Advertisement

तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मूळ भारतीय असलेल्या गुप्ता बंधूंचेही दक्षिण आफ्रिकेतील या संपूर्ण वादाशी खूप जवळचे नाते आहे. त्याचाच परिणाम म्हणून इथले भारतीय लक्ष्य केले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणार्‍या भारतीय समुदायाचे लोक म्हणतात की, जोहान्सबर्ग आणि क्वाझुलू नताल येथे भारतीय वंशाच्या लोकांना जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे.

Advertisement

याचा राजकीयदृष्ट्या वापर करून देशात आफ्रिका विरुद्ध भारतीय मूळ असलेले नागरिक असा अनावश्यक मुद्दा यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत असल्याचा हा परिपाक आहे. हिंसक वातावरणाच्या दरम्यान भारतीय व भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना जाळपोळ व लुटल्याच्या बातम्या येत आहेत. रामाफोसा यांनी राष्ट्राला संबोधित करताना असेही सांगितले की, संधीसाधू मंडळी या परिस्थितीचा व नागरिकांना लुटण्याचा फायदा घेत आहेत. या घटना राजकीय किंवा वांशिक नसून गुन्हेगारी आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार भारतीयांची दुकाने, व्यवसाय आणि घरे जळून खाक झाली आहेत.

Advertisement

इतकेच नाही तर अनेक भारतीयांच्या घरांवर पेट्रोल बॉम्बही टाकण्यात आले आहेत. भारतीयांच्या व्यवसाय असलेल्या ठिकाणाला आणि कारला आग लावण्यात येत आहेत. तिथे अल्पसंख्याक असलेल्या भारतीयांना लक्ष्य केले जात आहे. त्यातच सरकारने अशा दंगल होत असलेल्या भागात पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांचे प्राणही धोक्यात आले आहेत. याकोब झूम यांना कोर्टाच्या अवमान केल्याबद्दल 15 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा हा संपूर्ण वाद सुरू झाला. बर्‍याच वादानंतर झुमाने आत्मसमर्पण केले आणि त्याला तुरूंगात पाठविले गेले.

Advertisement

Advertisement

माजी राष्ट्रपती झुमा यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या आयोगासमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेले गुप्ता बंधू जेकब झुमावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही आरोपी आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका सरकार त्याला युएईमधून प्रत्यार्पित करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात जसा हिंदू, मुस्लीम व इतर धार्मिक मुद्दा आणून राजकारण करून लोकांना फसवले जाते तसाच हा गंभीर प्रकार आहे.

Advertisement

सध्या यूएईमध्ये स्व-निर्वासित जीवन जगणारे गुप्ता बंधूदेखील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत. झुमा हा तिन्ही गुप्ता बंधूंसह पन्नास अब्ज रॅन्डच्या भ्रष्टाचाराचा मुख्य आरोपी आहे. गुप्ता बांधवांनी त्यांच्याशी जवळीक साधल्यामुळे हा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले जात आहे. गुप्ता बंधूंनीही झुमाच्या दोन मुलांचा फायदा केल्याचा आरोप आहे. दक्षिण आफ्रिका सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचवेळी काही स्थानिक माथेफिरू वांशिक गटांनी यामध्ये संपूर्ण भारतीयांना दोषी ठरवून राजकारण करण्यास सुरुवात केल्याने हा हिंसाचार भडकला आहे.

Advertisement

मुजोर तालिबानी भडकले आणि त्यांनी देशांना दिलीय ‘अशी’ धमकी; पहा काय म्हटलेय त्यांनी

Advertisement

माणुसकीला काळिमा : VIP साठी पोलिसांनीच पळवला गरीबांचा ऑक्सिजन सिलिंडर; पहा नेमकी काय घडली घटना

Advertisement
Advertisement

Leave a Reply