Take a fresh look at your lifestyle.

‘तसल्या’ गोष्टी टाळण्याचे मोदींनी केलेय आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : कोरोनामुळे पर्यटन, उद्योग- व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी हिल स्टेशन तसेच मार्केट यांसारख्या ठिकाणी मास्क न वापरता फिरणे, गर्दी करणे योग्य नाही. कोरोनाची तिसरी लाट आपोआप येणार नाही, हे आपणास लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या काळात सतर्क राहणे खूप गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाटत आहे.

Advertisement

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने नुकताच एक सर्वे केला होता. यामध्ये आरोग्य तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांनी असे म्हंटले आहे, की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत देश तिसऱ्या लाटेचा मुकाबला अधिक सक्षमतेने करेल. जून महिन्यात हा सर्वे केला होता. यामध्ये काही जणांनी तिसरी लाट ऑक्टोबर मध्ये येईल असे म्हटले आहे. तर काही जणांनी ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येईल असे सांगितले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान देशात तिसरी लाट येईल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे नियोजन चालू असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्य भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिजोरम, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यांनी निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, यामुळे लोकांचा निष्काळजीपणा वाढत चालला आहे. मास्क वापरण्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी तर धडकी भरवणारी आहे. या प्रकारांमुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. केंद्र सरकारने याआधी सुद्धा इशारा दिला होता की, कोरोना प्रोटोकॉलकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास पुन्हा कठोर निर्बंध अमलात आणले जातील.

Advertisement

त्यानंतर आता मोदी पुढे म्हणाले, की कोरोना सातत्याने रूप बदलत आहे. अशा वेळी या विषाणूच्या प्रत्येक व्हेरिएंटवर लक्ष ठेवावे लागणार आहे. म्युटेशन नंतर हा विषाणू किती त्रासदायक ठरेल याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार रोखणे आणि वेळेवर उपचार करणे सुद्धा अत्यंय महत्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

शेतकरी स्वातंत्र्यासाठी संघटना आक्रमक; निवडणूकित उतरणार आंदोलनाचे शिलेदार..!

Advertisement

डाळिंब मार्केट अपडेट : पहा कोणत्या मार्केटला भाव मिळतोय चक्क 175 रुपये किलो..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply