Take a fresh look at your lifestyle.

कामाची बातमी.. टाटांची कंपनी देणार फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी, वाट कसली पाहता, लागा तयारीला..

मुंबई : टीसीएस, अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या आर्थिक वर्षात (2021-22) या कंपनीने 40 हजारांहून अधिक फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी दरवर्षीच अशी भरती करीत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

‘टीसीएस’चे जागतिक मानव संसाधनप्रमुख मिलिंद लक्कड यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की ‘टीसीएस’ कंपनीत सध्या पाच लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. खासगी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या कंपनीने मागील वर्षीही कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची भरती केली होती.

Advertisement

कोविडमुळे देशभर निर्बंध असले, तरी कंपनीला नोकरभरती करण्यात काेणतीच अडचण येणार नाही.  आम्ही गेल्या वर्षी भारतातल्या विविध ठिकाणांहून 40 हजार तरुणांना राेजगार दिला होता. यावर्षीही आम्ही 40 हजार वा त्याहून अधिक लोकांना नोकरी देणार असून, यावर्षीची भरती प्रक्रिया वेगाने करणार असल्याचे लक्कड यांनी सांगितले.

Advertisement

गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून भरती झालेल्या दोन हजार इंटर्न्सनादेखील कामाची संधी मिळाली होती. भारतात प्रतिभावंत लोकांची कमतरता नाही. त्यामुळे आम्ही भारतीयांना अधिक संधी देणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Advertisement

दिल्ली सरकारच्या पोर्टलवरही नोकरीसाठी नोंदणी
कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून, रोजगाराच्या शोधात आहेत. त्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या रोजगार बाजार पोर्टलवर रजिस्ट्रेशन करीत आहेत. जूनमध्ये या पोर्टलवर सुमारे 300 नोकऱ्यांची जाहिरात केली जात होती. या काळात रोज सरासरी 1092 लोक नोंदणी करीत आहेत.

Advertisement

‘टेट’च्या मदतीने शिक्षक भरती झालीय ‘पवित्र’; पहा हजारोंना कशी मिळाली नियुक्ती थेट..!
‘त्यांच्या’ नोकऱ्या शाबित राहणार रे.. पहा राज्य सरकारने काय केलीय महत्वाची घोषणा
नाशिकमध्ये स्थापन होणार ‘त्या’ पद्धतीची संस्था; पहा उद्योग व तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काय मदत होणार

Advertisement
Advertisement

Leave a Reply