Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आताही ‘दणका’ होणार.. पेट्रोलला मिळणार ‘त्याची’ किंमत..! पहा कशामुळे बसणार झटका..!

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे.

Advertisement

असे असताना इंधनाचे दर कमी होतील असे लोकांना वाटत होते. मात्र, ते काही आता शक्य होणार नाही. कारण, या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक बाजारातक कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. याचे कारणही आहे. तेलाच्या उत्पादनाच्या मुद्द्यावर सऊदी अरेबिया आणि युएई या देशात सध्या वाद सुरू आहेत. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक यास तेल उत्पादनावर ताबा मिळवायचा आहे.

Advertisement

मात्र, युएईने यास तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे वाद सुरू होऊन कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आणि या वादाचा त्रास सगळ्या जगालाच सहन करावा लागत आहे. आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ऑक्टोबर २०१८ नंतर पहिल्यांदाच ७७ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या मुद्द्यावर सध्या ओपेक देशात एकमत नाही. जर तेलाच्या मागणीच्या अनुरुप तेलाचे उत्पादन वाढले नाही तर पुढील काही दिवसात कच्चे तेल १०० डॉलरच्याही पुढे जाण्याचा अंदाज आहे. असे घडले तर देशात इंधनाच्या किमती आणखी वाढतील.

Loading...
Advertisement

दुसरीकडे पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही. आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताच विचार सरकारने केलेला नाही.

Advertisement

उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे. यावेळी पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून मिळाले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल 5.25 लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत. याच वेळी प्राप्तिकरातून मात्र सरकारला 4.69 लाख कोटी रुपये तमिळाले आहेत. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट करातून 4.57 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply