Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्थसाक्षरता : बँक कर्ज घेण्यासाठी अडचणी येत असतील तर वाचा ‘ही’ महत्वाची माहिती

आपल्याला जेव्हा नवे घर, एखादी मालमत्ता किंवा एखादे वाहन खरेदी करायचे असेल तर बहुतेक जण कर्ज घेण्याचा विचार करतात. या कारणांसाठी कर्ज घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. बँका किंवा अन्य खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले जाते. कर्ज मिळाल्यानंतर त्या कर्जाचे हप्ते देखील द्यावे लागतात. आपण कर्ज घेतो मात्र त्यातील काही गोष्टी बऱ्याच जणांना माहित नसतात. ‘क्रेडिट स्कोर’, ‘सिबील रिपोर्ट’ हे शब्द बऱ्याचदा कानी पडतात. मात्र, याचा अर्थ अनेक जणांना माहित नसतो. कर्जाच्या संदर्भात यांचा संबंध काय हे ही माहित नसते. त्यामुळे याबाबत नागरिकांना माहिती असणे महत्वाचे आहे.

Advertisement

घर, मालमत्ता किंवा कार खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. कारण एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे बऱ्याच जणांना अवघड असते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात. पण अनेक बँका किंवा वित्तीय कंपनीला कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट नक्की तपासला जातो. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते. पण तुम्हाला ‘क्रेडिट स्कोअर’ किंवा ‘सिबिल रिपोर्ट’ याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का जाणून घेतात, याची माहिती असणे आवश्यक आहे.

Advertisement

हा फरक लक्षात ठेवा : क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट कर्ज घेते वेळी महत्त्वाची मानले जाते. क्रेडीट स्कोअरचा उपयोग संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यासाठी केला जातो. जर एखादी व्यक्ती आधी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळच्या वेळी भरत असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. तसेच सिबिल रिपोर्ट हा तीन अंकांचा असतो. यात क्रेडीट स्कोअरच्या आधारे पाईंट निश्चित केले जातात. हे पाईंट ३०० ते ९०० च्या दरम्यान असतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ९०० च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच ७५० पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो. तर ३०० च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँकेकडून नाकारला जाऊ शकतो. क्रेडीट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिलची वेबसाइट किंवा अन्य बँकिंग सर्व्हिस अॅग्रीगेटर्सच्या वेबसाइटची मदत घेऊ शकता.

Loading...
Advertisement

असा चेक करता येईल क्रेडीट स्कोअर : क्रेडीट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिलची वेबसाईट किंवा अन्य बँकिंग सर्व्हिस अॅग्रीगेटर्सच्या वेबसाईटची मदत घेऊ शकता. त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये तुमचा तपशील भरुन तुम्ही स्कोअर चेक करु शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply