Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘त्या’ बँकेनेही दिलाय ग्राहकांना झटका; पहा खिशाला कसा बसणार आहे फटका..!

मुंबई : या वर्षात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक नियमांत बदल झाला आहे. महागाईतही वाढ झाली आहे. बँकिंग कामकाजात सुद्धा काही महत्वाचे बदल झाले आहेत, त्यानंतर आता पुढील महिन्यापासून आणखी एका बँकेने नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून आयसीआयसीआय बँकेच्या नियमात काही महत्वाचे बदल होणार आहेत. जर तुमचे या बँकेत खाते असेल तर तुम्हाला नियमात नेमके काय बदल केले आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे.

Advertisement

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बचत खातेधारकांसाठी व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कात बँकेने बदल केले आहेत. बँकेकडून चार व्यवहारापर्यंत कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत, त्यापेक्षा जास्त व्यवहार केल्यास आता चार्जेस द्यावे लागणार आहेत. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आता मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास १५० रुपये चार्जेस द्यावे लागतील.

Advertisement

बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमध्ये १ लाखांपर्यंत व्यवहार करता येतील, त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार असेल तर प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. एटीएम इंटरचेंज व्यवहारांसाठीही आता शुल्क द्यावे लागेल. त्यानुसार 6 मेट्रो लोकेशन्सवर एका महिन्यात पहिले तीन व्यवहार मोफत असतील. अन्य ठिकाणी एक महिन्यात 5 व्यवहार मोफत असतील. त्यानंतर मात्र 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार असे चार्जेस द्यावे लागतील.

Advertisement

एक वर्षात २५ चेकबुकसाठी बँक कोणतेही शुल्क घेणार नाही, त्यानंतर मात्र अतिरिक्त चेकबुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानांसाठी असे चार्जेस बँकेने निश्चित केले आहेत. दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीस आणखी काही बदल झाले आहेत. देशातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीस एलपीजी गॅस सिलिंडर किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे 1 जुलैपासून एलपीजी गॅस टाकीच्या किमतीत बदल होणार आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर आहेत त्यानुसार गॅस टाकीच्या किमती ठरत असतात.

Loading...
Advertisement

बेसिक सेविंग बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी एसबीआय एका आर्थिक वर्षात दहा चेक मोफत देईल. त्यांनतर मात्र दहा चेक असणाऱ्या चेकबुकसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी चेकबुकवर नवीन शुल्कात सवलत मिळणार आहे. एसबीआयने 1 जुलैपासून नवीन सर्व्हिस चार्ज लागू केले आहेत. बँकेच्या बेसिक सेविंग डिपॉझिट खातेधारकांना बँकेच्या शाखेतून किंवा एटीमद्वारे आता फक्त चार वेळेस कोणत्याही शुल्काविना पैसे काढता येणार आहेत. चार वेळेपेक्षा जास्त वेळेस पैसे काढायचे असतील तर नागरिकांना शुल्क द्यावे लागणार आहे.

Advertisement

देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त हिरो मोटोकॉर्प कंपनीने सुद्धा बाईक्स आणि स्कुटरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 1 जुलैपासून दुचाकी वाहनांच्या किमतीत साधारण 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा अंदाज आहे.

Advertisement

1 जुलैपासून आयडीबीआय बँकेच्या ग्राहकांना 20 पानी चेकबुक मोफत मिळणार आहे. यानंतर प्रत्येक चेकसाठी 5 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. याआधी बँकेत खाते उघडल्यानंतर वर्षात 60 पानांचे चेकबुक मोफत दिले जात होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply