Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऑगस्टपासून बदलणार ‘या’ बॅंकेचे नियम..! आताच जाणून घ्या, नाहीतर होऊ शकते नुकसान..

नवी दिल्ली :  येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या नियमात काही बदल होत आहेत. त्यामुळे तुमचे जर या बॅंकेत खाते असेल, तर हे नियम समजून घेणे गरजेचे आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बचत खातेधारकांसाठी व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कामध्ये बॅंकेने काही बदल केले आहेत. चला तर मग ‘आयसीआयसीआय’ बँक काय बदल करणार आहे, हे जाणून घेऊ या..

Advertisement

‘आयसीआयसीआय’ बँक ग्राहकांना 4 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा देते. यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. बँकेच्या वेबसाइटनुसार मोफत मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यावर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागणार आहेत हा नियम येत्या 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

Advertisement

ICICI च्या ग्राहकांना त्यांच्या होम ब्रँचमध्ये व्यवहाराची मर्यादा दरमहा 1 लाख असेल. त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागेल. होम ब्रँच नसणाऱ्या शाखेत प्रति दिन 25000 रुपयांच्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार केल्यास प्रति हजार रुपयांसाठी 5 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Advertisement

एटीएम इंटरचेंज ट्रान्झॅक्शनवरही शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार 6 मेट्रो लोकेशन्सवर एका महिन्यात पहिले तीन ट्रान्झॅक्शन फ्री असतील. एक महिन्यासाठी इतर ठिकाणी पहिले पाच ट्रान्झॅक्शन मोफत असतील. यानंतर 20 रुपये प्रति आर्थिक व्यवहार आणि 8.50 रुपये प्रति गैर-आर्थिक व्यवहारासाठी आकारले जाणार आहे.

Loading...
Advertisement

वर्षाला 25 चेकबुकसाठी कोणतेही शुल्क नसेल, मात्र, त्यापेक्षा अतिरिक्त चेक बुकसाठी 20 रुपये प्रति 10 पानांसाठी द्यावे लागणार आहेत.

Advertisement

कॅलेंडर महिन्यातील प्रथम रोख रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यानंतर फी असेल. यानंतर तुम्हाला पाच रुपये प्रति हजार रुपये या हिशेबाने द्यावे लागतील. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्यावी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply