Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खिशात पैसा राहतोय..! होमलोन फेडावे की दुसरीकडे गुंतवणूक करावी, पाहा तज्ञ्ज काय म्हणतात..?

नवी दिल्ली : आयुष्यात प्रत्येकाचे एक स्वप्न असते, ते म्हणजे स्वत:चे घरटे. त्यासाठी आपल्या मदतीला येतात बॅंका. घर घेण्यासाठी बहुतेक जण होमलोन घेतोच. सुरुवातीच्या काळात ईएमआय म्हणून फक्त व्याजच जमा केले जाते आणि फार कमी प्रमाणात मूळ रक्कम कमी होते. काही वर्षांनंतर मूळ रक्कम वेगाने कमी होऊ लागते. दरम्यानच्या काळात परिस्थिती सुधारते. हातात बर्‍यापैकी पैसा राहतो.

Advertisement

अशा वेळी अनेकांना आगाऊ रक्कम भरून होमलोनच्या कचाट्यातून बाहेर पडावे, डोक्यावरील कर्जाचा भार हलका करावा, असे वाटते. मात्र, तुमच्या खिशात जास्त पैसे राहत असतील, तर होमलोन कमी करावे, की इतर ठिकाणी गुंतवणूक करावी, कुठे जास्त फायदा होऊ शकतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. याबाबत आपण समजून घेऊ या..

Advertisement

आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला अतिरिक्त फंडावर गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा चांगला परतावा मिळत असेल, तर तुम्ही शक्यतो प्रीपेमेंट टाळलेले बरे. अशा कर्जदारांनी ‘एसआयपी’च्या मदतीने दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे.

Advertisement

साधारणपणे गृहकर्जाचा व्याज दर 7-8 टक्क्यादरम्यान असतो. अशा वेळी अतिरिक्त पैशांवरील परतावा जास्त असेल, तर कर्ज घेणाऱ्यांनी प्रीपेमेंट टाळावे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घ मुदतीत खूप चांगला परतावा मिळेल, की नाही हे निश्चित सांगता येत नाही. ‘इक्विटी मार्केट’मध्ये गुंतवणूक केल्यास सतत पोर्टफोलिओवर नजर ठेवावी लागेल, वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग करावी लागेल.

Loading...
Advertisement

आपत्कालीन निधीअंतर्गत गृहकर्जाचे 6 ते 12 ईएमआय कव्हर असले पाहिजेत. याव्यतिरिक्त जीवनविमा आणि आरोग्यविमा यांचे चांगले कवच देखील आवश्यक आहे.

Advertisement

गृहकर्जावर विविध करसवलती मिळतात.  80C सी अंतर्गत मूळ परतफेडीवर 1.5 लाख रुपयांची कपात होते. व्याजाच्या परतफेडीवर 2 लाख रुपयांची सूट आहे. तुम्ही प्रीपेमेंट केल्यास, त्याचा कर लाभांवर कोणताही परिणाम होणार नाही, हेही लक्षात घ्या.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply