Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

साेने दोन महिन्यांच्या निच्चांकावर..! गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, सराफ बाजारातील आजची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात चढउतार दिसत आहेत. सोन्याच्या किंमतीवर दबाव असून, सोने 47 हजारांच्या खाली घसरले. भविष्यात सोन्याचा दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोन्याचा दर आणखी कमी झाल्यास त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. येत्या डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजारांचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Advertisement

सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांच्या निच्चांकावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज (सोमवारी) डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबुती आल्याने भारतीय वायदे बाजारात त्याचे पडसाद उमटले. मल्टी कमोजिटी एक्स्चेंज मार्केटमध्ये (MCX) आज सोने (Gold) 23 रुपयांनी वधारून 47308 च्या स्तरावर गेले. चांदीच्या किंमतीतही तेजी दिसून आली. चांदीचा प्रतिकिलो भाव 382 रुपयांनी वाढून 69500 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

Advertisement

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना, परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात (Gold Rate) झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम दिसत आहे. 18 जूनला परकीय चलन गंगाजळी 4.148 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन 603.933 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

Loading...
Advertisement

परकीय मुद्रा भांडारातील युरो, पाऊंड आणि येन या परकीय चलनांच्या विनिमय दरात मोठे चढउतार होत आहेत. यापूर्वी 4 जून रोजी Forex Reserves वाढ पाहायला मिळाली होती. कोरोनाच्या संकटकाळातही परकीय गुंतवणुकदारांनी भारतावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply