Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जून महिन्यात झालीय ‘या’ कराची सर्वाधिक विक्री; पहा काय चालू आहे मार्केट ट्रेंड

मुंबई : देशात काही वर्षांपासून वाहनांचा वापर वाढला आहे. वेगाने होणारे औद्योगिकरण, तितक्याच वेगाने वाढणारी शहरे यांमुळे देशभरात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. विविध कंपन्यांची चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसत आहेत. यामध्ये काही कंपन्यांच्या वाहनांना जास्त मागणी आहे.

Advertisement

देशात जून महिन्यात मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगन आर या चारचाकी वाहनाची सर्वाधिक विक्री झाली आहे. जून २०२१ मध्ये या कारच्या १९ हजार ४४७ युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षात म्हणजे जून २०२० मध्ये ६ हजार ९७२ युनिट्सची विक्री झाली होती. कोरोनाचे संकट असतानाही एकाच वर्षात कंपनीच्या वाहन विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

देशात स्विफ्ट कारलाही मोठी मागणी आहे. मात्र, यावेळी वॅगन आर ने या कारला सुद्धा मागे टाकले आहे. मागील महिन्यात मारुती कंपनीने स्विफ्ट कारच्या १७ हजार ७२७ युनिट्सची विक्री केली होती. आता मात्र वॅगन आर ने बाजी मारली आहे. त्यामुळे स्विफ्ट कार सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ या आर्थिक वर्षात सीएनजी सेगमेंटमधील विक्रीत सुद्धा वॅगन आर आघाडीवर आहे.

Loading...
Advertisement

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता एलपीजी तसेच इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय म्हणून विचार केला आहे. म्हणूनच आता एलपीजी सेगमेंटमधील चारचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. वॅगन आरच्या सीएजी सेगमेंटची सुद्धा मोठ्या संख्येने विक्री झाली आहे.

Advertisement

मारुती सुझुकी कंपनीने जून महिन्यात एकूण १ लाख ४७ हजार ३८८ युनिट्सची विक्री केली आहे. जून महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या १० चारचाकी वाहनांच्या यादीत मारुतीच्या ८ वाहनांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ह्युंदाई कंपनीच्या क्रेटा एसयूव्ही आणि आय १० प्रीमियम हॅचबॅक कारचा समावेश आहे. त्यामुळे मारुतीनंतर ह्युंदाई कंपनीच्या चारचाकी वाहनांना देशात मागणी आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply