Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘बुलेट’च्या वेगाने सुरू आहे की ‘त्यांचे’ एक्स्पोर्ट; पहा कुठे जातोय ‘हा’ भारतीय माल..!

मुंबई : देशात काही वर्षांपासून वाहनांचा वापर वाढला आहे. औद्योगिकरण आणि तितक्याच वेगाने वाढणारी शहरे यामुळे जगभरात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज लाखोंच्या संख्येत नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकी आणि चारचाकी या दोन्ही प्रकारच्या वाहनांना मागणी वाढली आहे. विदेशात सुद्धा मागणी वाढली आहे. कोरोनाचे संकट असतानाही काही दिवसांपासून वाहनांचे मार्केट मात्र तेजीत आहे.

Advertisement

दुचाकी वाहनांचा विचार केला तर अनेक कंपन्यांची वाहने मार्केट मध्ये आहेत. या दुचाकी वाहनांना मागणी सुद्धा आहे. मात्र रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकी वाहनांची एक वेगळीच क्रेझ आहे. भारतातच नाही तर विदेशातही या दुचाकीस मागणी वाढली आहे.

Advertisement

कंपनीने जून महिन्यात किती वाहनांची विक्री झाली आहे, याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जून 2021 मध्ये कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत 13 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये कंपनीने दुसऱ्या देशात विक्री केलेल्या वाहनांची संख्या सुद्धा आहे. जून महिन्यात कंपनीने एकूण 43 हजार 048 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षातील म्हणजे जून 2020 मध्ये कंपनीने एकूण 38 हजार 65 युनिट्सची विक्री केली होती.

Loading...
Advertisement

कंपनीने जून मध्ये एकूण 7 हजार 233 दुचाकी वाहने परदेशात निर्यात केली आहेत. मागील वर्षातील जून 2020 मध्ये कंपनीने 1 हजार 555 दुचाकी वाहने परदेशात निर्यात केली होती. म्हणजेच एक वर्षाच्या काळात कंपनीच्या दुचाकी निर्यातीत तब्बल 365 टक्के वाढ झाली आहे. रॉयल एनफिल्डच्या दुचाकी वाहनांची एक वेगळी क्रेझ आहे. रोड ट्रिप्स, लॉंग राईड तसेच दूरच्या प्रवासासाठी या दुचाकी वाहनास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतासह विदेशातही या कंपनीच्या दुचाकीस मागणी वाढली आहे.

Advertisement

देशात काही वर्षांपासून वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे दररोज हजारो नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. दुचाकी प्रमाणेच चारचाकी वाहनांना सुद्धा मागणी वाढली आहे. त्यामुळे जून महिन्यात देशभरात मारूती सुझुकी कंपनीच्या वॅगन आर या कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. तसेच या कंपनीने आता स्विफ्ट कारलाही मागे टाकले आहे. देशभरात कोरोना संकटातही चारचाकी वाहनांना सध्या मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply