Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तरीही रेल्वेला आलीच की बरकत; पहा कशामुळे कमावला ११ हजार कोटींचा महसूल

दिल्ली : कोरोनाच्या संकटात रेल्वेस मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. लॉकडाऊन काळात रेल्वे वाहतूक जवळपास ठप्प होती. त्याचा परिणाम रेल्वेच्या अर्थकारणावर पडला होता. प्रवासी वाहतूक होत नसली तरी या काळात माल वाहतूक मात्र सुरूच होती. आणि याच माल वाहतुकीने संकट काळात रेल्वेस आधार दिला आहे. होय, रेल्वेने माल वाहतुकीच्या माध्यमातून जून महिन्यात तब्बल ११ हजार १८६ कोटी रुपये इतका घसघशीत महसूल मिळवला आहे. या महिन्यात रेल्वेने ११२.६५ दशलक्ष टन माल वाहतूक केली आहे. जून २०१९ च्या तुलनेत यामध्ये ११.१९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement

कोरोना काळात रेल्वेस अनेक दिवस प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागली. काही ठराविक प्रसंगी प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र, ही वाहतूक फार होत नव्हती. त्यामुळे या काळात रेल्वेने माल वाहतुकीस प्राधान्य दिले होते. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून आले आहेत. सप्टेंबर २०२० ते जून २०२१ या काळात रेल्वेने विक्रमी माल वाहतूक केली आहे. जून महिन्यात रेल्वेने माल वाहतुकीतून ११ हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. मागील जून २०१९ आणि जून २०२० मधील उत्पन्नाचा विचार केला तर त्या तुलनेत जून २०२१ मध्ये रेल्वेस जास्त उत्पन्न मिळाले आहे.

Advertisement

जून २०१९ आणि जून २०२० मध्येसुद्धा रेल्वेस माल वाहतुकीद्वारे चांगले उत्पन्न मिळाले होते. यावेळी मात्र जास्त उत्पन्न मिळवण्यात रेल्वेने यश मिळवले आहे. काही वर्षांपासून माल वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रेल्वे द्वारे होणाऱ्या माल वाहतुकीचे प्रमाण सुद्धा सातत्याने वाढत चालले आहे. या वाहतुकीनेच कोरोना काळात रेल्वेस मदत केली आहे. त्यामुळे रेल्वेस फार मोठे नुकसान सहन करावे लागले नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला आहे. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले आहेत. सार्वजनिक वाहतूक सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे रेल्वेने सुद्धा आपल्या बंद असलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत. तसेच काही नवीन फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. लॉकडाऊन काळात सुद्धा कमी प्रमाणात का होईना मजूर आणि कामगारांची वाहतूक सुरू होती. मात्र, याद्वारे फारसे उत्पन्न मिळाले नाही. माल वाहतुकीसाठी नियोजन केल्याने त्याचा फायदा आता मिळाला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतूनही रेल्वेने भरघोस उत्पन्न मिळवले आहे. या एकाच वर्षात भंगार विकून रेल्वेस तब्बल 4 हजार ५७५ रुपये मिळाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply