Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इम्रान खान सरकारचे डोके पडलेय बंद; पहा कोणत्या संकटात होरपळत आहे पाकिस्तानी

दिल्ली : दहशतवादास कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे ग्रह सध्या फिरले आहेत. कारण, या देशात रोजच नवे संकट येत आहे. कोरोना आणि महागाईने हैराण झालेल्या या देशात अन्न धान्याचा संकट तर आधीचेच आहे. मात्र, आता देशात दुष्काळाचेही संकट उभे राहू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुष्काळाचे संकट येऊ द्यायचे नसेल देशातील पाण्याच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. देशात कमी पाऊस झाल्यामुळे आज पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

जियो न्यूज नुसार पाकिस्तानमध्ये पाण्याची उपलब्धता प्रती व्यक्ती ११०० मिलीयन क्युबिक मीटर प्रति वर्ष अशी आहे. हे प्रमाण खूप कमी आहे. देशातील अनेक ठिकाणी तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. सहाशे मीटरपर्यंत सुद्धा पाणी मिळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. याआधी ५० मीटरलाच पाणी मिळत होते. रिपोर्टमध्ये पुढे असे म्हटले आहे, की दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही. यावेळी जवळपास 45 टक्के पाण्याची कमतरता असते. आज देशातील अनेक मोठ्या शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे जल तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे, की आगामी काळात जर नवीन जलाशय तयार केले नाहीत आणि पाण्याचा अपव्यय टाळला गेला नाही तर देशात भीषण दुष्काळ निर्माण होण्याचा धोका आहे.

Advertisement

देशाची वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि पाण्याचा अपव्यय या काही महत्वाच्या समस्या आहेत, आगामी काळात याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून जर सतर्क राहिलो नाही दुष्काळाच्या संकटास कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नवीन पाकिस्तानचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनीच आता मान्य केले आहे की देश कंगाल झाला आहे. अन्न सुरक्षा हे देशासमोरील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान खान यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. देशात आज अन्न धान्याचे संकट निर्माण झाले आहे. भारता बरोबर व्यापार बंद असल्याने देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, देशाच्या राज्यकर्त्यांना त्याची काळजी नाही. तर दुसरीकडे देशात आज 40 टक्के मुले कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत, हे सुद्धा त्यांनी मान्य केले होते.

Loading...
Advertisement

पाकिस्तानने मागील वर्षात 40 दशलक्ष टन गहू आयात केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात गहू आयात केल्याने त्याचा परिणाम देशाच्या परकीय चलसाठ्यावर झाला. आज देशासमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. सकस आहाराअभावी देशातील 40 टक्के मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत नाही, असे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply