Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’निमित्ताने महाराष्ट्र भाजपच्या राडावर आहेत नितीन गडकरी..! पहा नेमके काय म्हटलेय मालिकांनी

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या आधिवेशनास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींनी वेग घेतला आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीनेही जशास तसे उत्तर देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या आधिवेशनात चांगलाच गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Advertisement

साखर कारखान्यांच्या चौकशीची मागणी करुन आता भाजप नेते आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते, आता चंद्रकांत पाटील आरोप करत आहेत. असे करुन भाजप नेतेच गडकरी यांना अडचणीत आणत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Advertisement

ज्यावेळी गडकरी यांना दुसऱ्या वेळेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात येणार होते. त्यावेळी सुद्धा गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांना अध्यक्ष पदापासून दूर रहावे लागले. आता पुन्हा भाजप नेते त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, काही दिवसांपासून विरोधी भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. विधीमंडळाच्या आधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर भाजपने आधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक तत्काळ घ्यावी तसेच आधिवेशनाच्या कालावधीत वाढ करावी, या मागण्या भाजपने केल्या आहेत. राज्य सरकार मात्र आधिवेशनाच्या कालावधीत वाढ करण्याच्या मूडमध्ये नाही. यासाठी सरकारने कोरोना संक्रमणाचे कारण दिले आहे. या आधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विधेयके हे कामकाज मुख्यत्वे असणार आहे. त्यामुळे या आधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply