Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आताच घ्या कार..! ऑगस्टमध्ये होणार भरमसाठ दरवाढ, महागाईमुळे ही कंपनी वाढवतेय कारच्या किमती..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महागाईने विक्रम केले आहेत. सर्वच क्षेत्राला या वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. स्टील आणि मौल्यवान धातूंसारख्या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे जपानमधील दिग्गज कंपनी होंडाने (Honda) पुढील महिन्यापासून भारतात कारचे दर वाढविण्याची तयारी केली आहे.

Advertisement

इनपुट कॉस्टमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे कंपनी आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Advertisement

भारतीय मार्केटमध्ये होंडा कंपनीच्या सिटी आणि अमेझसह विविध प्राॅडक्ट्सची विक्री होते. कारच्या किमती वाढविण्याचा विचार सुरू असला, तरी त्याचा किती भार ग्राहकांवर टाकावा, याबाबत कंपनी सध्या विचार करीत आहे

Loading...
Advertisement

स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि मौल्यवान धातूंच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. पैकी काही वस्तूंच्या किंमती उच्चांकी स्तरावर आहेत. परिणामा, उत्पादनखर्च वाढल्याची माहिती होंडा कार्स इंडियाचे सीनिअर व्हाइस प्रेसिंडंट आणि डिरेक्टर (मार्केटिंग अँड सेल्स) राजेश गोयल यांनी सांगितले.

Advertisement

ते म्हणाले, की आम्ही सध्या दरवाढीच्या तपशिलावर काम करीत आहोत. ही दरवाढ ऑगस्टपासून केली जाणार आहे. आमचे लक्ष्य ग्राहकांसाठी कार खरेदीची किंमत कमी ठेवणे हेच आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा किती भार स्वत: घ्यायचा आणि किती ग्राहकांवर टाकायचा, याबाबत कंपनी सध्या विचार करीत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply