Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मनाजोगी नोकरी..! निवांत झोपण्यासाठी 10 लाखांचा पगार, पाहा कुठे होणार ही अनोखी स्पर्धा..?

नवी दिल्ली : 2020 वर्ष कठीण गेले. कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, ताणतणाव वाढला. तास न तास ‘वर्क फ्राॅम होम’ काम केल्यामुळे लोकांची झोप उडाली. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

विशेषतः 25 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात झोपेची समस्या निर्माण झाली आहे. ही बाब ओळखून बंगळुरूतील एका कंपनीने चक्क झोपेची स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

Advertisement

‘स्लीप अॅंड हाउस सोल्युशन कंपनी वेकफिट’ या कंपनीने ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. हा एक स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम आहे. ज्यामध्ये निवडलेल्या स्लीप इंटर्नला लाखो कमाविण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मागील सिझनला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने कंपनीने नव्या जोमाने यंदा दुसरा सिझन आणला आहे. पूर्वीपेक्षाही यावेळचा सिझन अधिक खास, मोठा आणि चांगला असेल. यात इंटर्नची एकमेकांशी स्पर्धा होईल. येथे झोप ही नोकरीसारखे असून, त्यासाठी तुम्हाला चक्क 10 लाख रुपये दिले जाणार आहे.

Loading...
Advertisement

स्पर्धेतील विजेत्याला 10 लाख रुपये मिळतील. इंटर्नमध्ये निवड झालेल्या लोकांना 1 लाख रुपये मिळतील. 10 लाखांचे ग्रँड प्राईज असून, विजेत्याला भारताच्या स्लीप चॅम्पियनचे विजेतेपद मिळेल. वार्षिक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनसाठी आतापर्यंत सुमारे 60,000 अर्ज आले आहेत.

Advertisement

दुसऱ्या सिझनची निवडप्रक्रिया अधिक कठीण असून, ती पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना सलग 100 रात्री 9 तास शांत झोप घ्यावी लागेल. हे काम रोज रात्री करावे लागेल. म्हणजे, हीच त्यांची नोकरी असेल. वेकफिट कंपनी इंटर्नला झोपण्यासाठी गादी, चांगला स्लीप ट्रॅकर देणार आहे.

Advertisement

तसेच, झोपेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी कंपनी इंटर्नसाठी झोपेचे तज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ, गृहसजावटीचे तज्ज्ञ इत्यादींसह समुपदेशन सत्रांची सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply