Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कंगाल पाकिस्तानचे ‘हे’ आहे विदारक वास्तव; पहा इम्रान खान यांनीच कशाची दिलीय कबुली..!

दिल्ली : कोणाला किती ही खोटे सांगण्याचा प्रयत्न केला तरी सत्य कधी ना कधी समोर येतेच. नेमका असाच प्रकार भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानबाबत घडला आहे. पाकिस्तानचे सत्ताधारी जगभरात नव्या पाकिस्तानचे कितीही गोडवे गात असले तरी आज देशातील अवस्था त्याच जगसमोर आली आहे. आणि या प्रकारांची पोलखोल दुसरे कुणी नाही तर खुद्द पाकिस्तानाचेच राज्यकर्ते करत आहेत. नवीन पाकिस्तानचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनीच आता मान्य केले आहे की देश कंगाल झाला आहे. अन्न सुरक्षा हे देशासमोरील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान खान यांनी सांगितले.

Advertisement

देशात आज अन्न धान्याचे संकट निर्माण झाले आहे. भारता बरोबर व्यापार बंद असल्याने देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, देशाच्या राज्यकर्त्यांना त्याची काळजी नाही. तर दुसरीकडे देशात आज 40 टक्के मुले कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत, हे सुद्धा त्यांनी मान्य केले आहे.

Advertisement

डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने मागील वर्षात 40 दशलक्ष टन गहू आयात केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात गहू आयात केल्याने त्याचा परिणाम देशाच्या परकीय चलसाठ्यावर झाला. आज देशासमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. सकस आहाराअभावी देशातील 40 टक्के मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत नाही, असे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, कोरोनाने या देशाच्या अर्थव्यवस्थेस जबर फटका बसला आहे. बेरोजगारी वाढली आहे, गरीबीत वाढ झाली आहे. आता तर महागाई सुद्धा रोज नवे रेकॉर्ड करत आहे. देशातील महागाईचा दर 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे फक्त एक किलो साखरेसाठी नागरिकांना तब्बल 110 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक किलो गव्हाच्या पिठासाठी 96 रुपये द्यावे लागत आहे. या वाढत्या महागाईने देशातील लोक हैराण झाले आहेत.

Advertisement

देशात ऑगस्ट 2019 पासून महागाई सातत्याने वाढत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता व्यापार जवळपास बंदच आहे, त्यामुळे या देशात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, अनेक जीवनावश्यक वस्तू भारताकडूनच खरेदी कराव्या लागत होत्या आता मात्र व्यापार बंद असल्याने या वस्तूंचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पाकिस्तानला अन्य देशांकडून जादा दराने या वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply