Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या कृपेने भारतीयांना आलेत ‘जुने दिन’; पहा नेमके काय करावे लागतेय गृहिणींना

जयपूर : देशातील इंधन दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस तर सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने देशभरात आंदोलनेही केली आहेत. काँग्रेस नेतेसुद्धा सातत्याने सरकारच्या या कारभारावर टीका करत आहेत. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा इंधन दरवाढ, गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला टार्गेट करत आहेत. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

गहलोत म्हणाले, की ‘मोदी सरकारने मागील १४ महिन्यांच्या काळात घरगुती गॅस टाकीचे दर २५५ रुपयांना वाढवले. त्यात आता अनुदान सुद्धा बंद केले आहे. या दरवाढीमुळे नागरिकांना आता पुन्हा जुन्या पद्धतींचा (लाकूड किंवा इतर वस्तू जाळणे) वापर करण्यास भाग पडले आहे. ग्रामीण भागात आणि शहरी गरीब पुन्हा जुन्या पद्धतीने स्वयंपाक करीत आहेत. याआधी युपीए सरकारच्या काळात ४५० रुपयांनी मिळणारी गॅस टाकी आताच्या मोदी सरकारच्या काळात ८३८ रुपयांना मिळत आहे,’ अशा शब्दांत गहलोत यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोना संकटाच्या पाठोपाठ महागाईचे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तर रोजच वाढत चालले आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यानंतर नागरिकांना आणखी झटका बसला आहे. 1 जुलैपासून घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 25.5 रुपये वाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने गॅस टाकीचे।दर वाढणार असल्याचा अंदाज होताच. त्यानुसार तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. या दरवाढीमुळे आधीच वाढत असलेल्या महागाईत आणखी वाढ झाली आहे.

Loading...
Advertisement

या दरवाढीचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विरोधक सुद्धा केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्यात दोन दिवस आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply